Ahmednagar Politics: संग्राम जगताप, निलेश लंकेंवर 'दादांची कृपा'; कोट्यवधींच्या निधीला दिली मंजुरी

Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात नगरसाठी 89 कोटी तर पारनेरसाठी 73 कोटींचा निधीला मंजुरी
Sangram Jagtap and Nilesh Lanke
Sangram Jagtap and Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी बजेटमधील निधी वाटपात भेदभाव झाल्याची ओरड शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी करत अर्थमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. मात्र, अजितदादांकडून हे आरोप फेटाळण्यात आले असून आमदारांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. विरोधात असताना स्थगिती आलेल्या काही आमदारांच्या मतदारसंघातील कामावरील स्थगिती उठवत त्यांनी कोट्यवधींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगरचे आमदार संग्राम जगताप आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी मोठा निधी आपापल्या मतदारसंघासाठी खेचून आणल्याचे दिसून येत आहे. अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर सुरू झालेल्या अधिवेशनात नगरसाठी 89 कोटींचा तर पारनेरसाठी 73 कोटींचा निधी आणण्यात या लोकप्रतिनिधींना यश आले आहे.

Sangram Jagtap and Nilesh Lanke
Ajit Pawar On Wadettiwar : माझं बारामती सोडण्याचं धाडस नाही; वडेट्टीवार कुठूनही निवडून येतात; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

नगरसाठी पुरवणी बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांसाठी 25 कोटी, माळीवाडा बसस्थानकासाठी 16 कोटी असा 41 कोटी तर, स्थगिती उठवलेल्या कामांत नगरविकास विभागाच्या 25 कोटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 23 कोटींच्या कामांना निधी मंजूर झाला आहे. नगर शहर विकासाला यापुढे निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

पारनेर-नगर मतदारसंघात पुरवणी मागण्यांत 29 कोटी, दलित सुधार वस्ती योजनेअंतर्गत 1 कोटी, स्थगिती उठवलेल्या कामांना 38 कोटी, नगर पंचायतीसाठी 5 कोटी अशी भरीव तरतूद पदरात पडत आहे. पर्यटन विकास कामांतर्गत स्थगिती असलेली 10 कोटींची कामेही लवकरच मार्गी लागतील, असे आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले.

Sangram Jagtap and Nilesh Lanke
Mahajan-Khadse News : मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच, तुमची अवस्था काय ? ते बघा ; खडसे-महाजन पुन्हा भिडले..

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना पुरवणी मागण्यांत सरासरी 20 कोटींची तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी केली असली तरी स्थगिती आलेल्या कामांच्या निधीसाठी सध्या चढाओढ असून यात एकीकडे न्यायालयीन लढाई तर दुसरीकडे 'दादांची कृपा' यासाठी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. एकूण स्थगिती उठवत निधीची मंजुरी मिळालेले लोकप्रतिनिधी सध्या जोमात असल्याचे एकूण चित्र जिल्ह्यात आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com