Bjp : धक्कादायक, धुळ्यात उमेदवाराच्या विजयासाठी अधिकाऱ्यांवर भाजपने दबाव टाकला?

Sanjay Raut On Bjp : शिवसेना नेते राऊत यांनी निवडणूक निकालाबाबत भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama

Sanjay Raut News : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर मोठा दबाव होता. त्यासाठी केंद्रातून फोन आले होते, असा धक्कादायक दावा शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेना नेते राऊत ( Sanjay Raut ) यांनी निवडणूक निकालाबाबत भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला.

संजय राऊत म्हणाले, "निवडणूक निकालात हेर-फेर झाल्याचे उघडकीस आले आहे. भारतीय जनता पक्षाकडून याबाबत मोठा गोंधळ निर्माण करण्यात आला. केंद्रातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सतत फोन येत होते. धुळे मतदारसंघाचा निकाल सात मतदान यंत्रे शिल्लक असतानाच जाहीर करण्यासाठी दबाव होता. मात्र, स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे तसे होऊ शकले नाही."

Narendra Modi, Amit Shah
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोग 'अ‍ॅक्शन' मोडमध्ये; नेमकं प्रकरण काय?

"देशातील शंभराहून अधिक जागा 500 ते 1000 मतांच्या अंतराने भाजप जिंकला आहे. त्यासाठी दबाव आणण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी अक्षरशा शंभरावर अधिक जागा ओरबाडल्या आहेत. ईडीच्या दबावाने काही जागा लुटल्या," असा दावाही त्यांनी केला.

निवडणूक आयोग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख ठाकरे यांचे चौकशी करणार असल्याच्या बातम्या आहेत. यावर खासदार राऊत यांनी निवडणूक आयोगाची चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले, "सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे. हे सरकार कोसळल्यावर पहिली कारवाई आम्ही निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर केली जाईल."

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com