Sanjay Raut Politics: संजय राऊत यांचे मोठे विधान, महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार!

Sanjay Raut; Good communication in Mahavikas Aghadi, tension and confusion in Mahayuti -महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीच नसल्याचा राऊत त्यांचा दावा.
Sanjay-Raut
Sanjay-RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र राज्य सरकार याबाबत चाल ढकल करत आहे. निवडणुकांना सामोरे जाण्याचे महायुतीची तयारी नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची बैठक आज येथे झाली. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव महापालिकांच्या निवडणुकी संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. या संदर्भात खासदार राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत.

Sanjay-Raut
BJP Politics: कंत्राटदारावर कारवाई ऐवजी भाजप नेते वृक्षप्रेमींवरच बरसले, काय आहे प्रकरण?

यावेळी ते म्हणाले, महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष एखादा अपवाद वगळता एकत्रितपणे महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात उत्तम संवाद आहे. आगामी निवडणुका संदर्भात महाविकास आघाडीची तयारी अतिशय नियोजनपूर्वक करण्यात येत आहे.

Sanjay-Raut
Dhule BJP Politics: भाजप शहराध्यक्ष गजेंद्र अंपलवार यांची नियुक्ती होताच राष्ट्रवादीचा राजकीय हल्ला!

महायुतीमध्ये मात्र मोठा विसंवाद आहे. त्यांची कोणतीच डिलिव्हरी नॉर्मल झालेली नाही. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राजकीय जन्म हा अपरिहार्य तेथून आणि भाजपची गरज यातून झाला आहे. त्यामुळे निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांची सध्या तयारी दिसत नाही. त्यांची तयारी जेव्हा होईल तेव्हा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल.

राज्य शासनाकडून राज्यातील सर्व महापालिका प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. प्रशासकांच्या मार्फत राज्य शासन आणि संबंधित मंत्री आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. खऱ्या समस्या आणि शहराच्या सुविधा याचा बोजवारा उडालेला आहे. झालेल्या पावसाने प्रशासकीय कारकीर्दीतील कामकाजाचे पितळ उघडे पडले, असे राऊत यांनी सांगितले.

सध्या राज्य शासनाचा एकमेव कार्यक्रम भ्रष्टाचार हा आहे. यातील सर्व २७ महापालिकांमध्ये भ्रष्टाचार हा एकमेव अजेंडा घेऊन कामकाज केले जात आहे. अर्थाने भ्रष्टाचारासाठी महापालिकांमध्ये एक खिडकी योजना सुरू आहे. मध्ये शहराचे मूलभूत प्रश्न आणि समस्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.

महायुतीने जनतेच्या समस्यांमध्ये भर टाकणारे राजकारण तातडीने थांबवावे. त्यांनी महापालिकांचे सभागृह सैतानाच्या हाती दिले आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. शासनाने महापालिकांमध्ये लोकनियुक्त शासन आणि लोकप्रतिनिधी दिले पाहिजे. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रात दिसून येतील, इशाराही त्यांनी दिला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com