Sanjay Raut politics: जळगावमध्ये महाविकास आघाडीत मतदार संघ बदलणार की उमेदवार?

Sanjay Raut politics; Will Shivsena UBT & NCP Sharad Pawar exchange constituencies-माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी महापौर जयश्री महाजन यांच्यात मतदारसंघाची अदलाबदल होणार का?
Jayshree Mahajan & Gulabrao Devkar
Jayshree Mahajan & Gulabrao DevkarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics News: विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकेल. त्यामुळे महाविकास आघाडी जागावाटपाएवढेच प्रबळ उमेदवारांच्या निवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. जळगावमध्ये त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे घटक काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा आहे. यात काँग्रेस पक्ष ठराविक मतदारसंघांतच प्रभावी असल्याचे चित्र आहे.

विशेषतः हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेस पक्षातील नेते जमिनीवर आल्यासारखी स्थिती आहे. मतदार संघ वाटपातील मुख्य संघर्ष शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच आहे. हा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न आहे.

जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण हे दोन मतदारसंघ कळीचे मुद्दे बनले आहेत. जळगाव शहरातून भाजपचे आमदार सुरेश भोळे तर जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिंदे गटात गेलेले मंत्री गुलाबराव पाटील हे महायुतीचे प्रबळ उमेदवार आहेत. त्यांच्या पराभवासाठी शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Jayshree Mahajan & Gulabrao Devkar
Balasaheb Thorat Politics : बाळासाहेब थोरातांची खेळी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखेंना मोठा धक्का?

या पार्श्वभूमीवर सध्या जळगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे तर ग्रामीण शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांकडे संबंधित मतदार संघासाठी प्रबळ उमेदवाराची वाणवा आहे. त्यामुळे अशा उमेदवाराचा नेत्यांकडून शोध घेतला जात आहे.

जळगाव ग्रामीण मतदार संघातील मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हे एकमेकांचे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी परस्परांविरुद्ध उमेदवारी केली आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री देवकर यांना मंत्री पाटील यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची प्रबळ इच्छा आहे. मात्र हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे त्यांची राजकीय अडचण होत आहे. दुसरीकडे शहरात भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.

Jayshree Mahajan & Gulabrao Devkar
Balasaheb Thorat : 'अध्यादेशाच असं झालंय की, आला की, कर पास'; थोरात म्हणाले, 'मुख्यमंत्री वाचतच...'

शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन या गेली दोन वर्ष विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांना सुरेश दादा जैन गटाचे जे काही नेते सक्रीय आहेत, त्यांचीही सहानुभूती आहे. हा मतदारसंघ सुरेश दादा जैन यांचा परंपरागत मतदार संघ आहे.

या स्थितीत माजी महापौर महाजन या शहरात प्रबळ उमेदवार मानल्या जातात. अशा स्थितीत महाविकास आघाडीचे घटक असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मतदारसंघांची अदलाबदल करण्यासाठी दबाव येत आहे.

मतदार संघांचे वाटप आणि उमेदवारांचे घोषणा अल्पावधीतच होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मतदार संघाची अदलाबदल न झाल्यास उमेदवारांची अदलाबदल करण्याचाही विचार होऊ शकतो. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर महाजन तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री देवकर मशाल हाती घेऊ शकतात. आता निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे मतदार संघाची अदलाबदल होते की, उमेदवारांची देवाण-घेवाण होते हा चर्चेचा विषय आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com