Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Sarkarnama

Satyjeet Tambe : '' माध्यमांमध्ये अर्धसत्य पसरवलं जातंय; मी पूर्णसत्य बोलेन तेव्हा, सारे चकित होतील!''

Political News : मी काँग्रेसचाच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फक्त..
Published on

Nashik News : नाशिक पदवीधर निव़डणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. ही निवडणूक सुरुवातीपासून चर्चेचा विषय ठरली आहे. आथा मतदानाच्या पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांनी आपल्या विजयाचा दावा ठोकला होता. आता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी देखील मोठं विधान केलं आहे. तांबे यांनी आपला विजय झालेलाच आहे. फक्त मताधिक्य किती मिळतं याचीच उत्सुकता आहे असा दावा केला आहे.

सत्यजीत तांबे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. तांबे म्हणाले, माझा नाशिक पदवीधर मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे. फक्त उत्सुकता एवढीच आहे की, मताधिक्य किती मिळतं,आणि किती मतदान होतं. निवडणुकीपर्यतच आम्ही राजकारण करत असतो. त्यानंतर आम्ही लगेच कामाला सुरुवात करतो. म्हणूनच पक्षभेद, मतभेद विसरुन आमच्या पाठीशी लोक उभे राहत आहे असेही सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले.

तांबे म्हणाले. मी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचाच फार्म भरला आहे. फक्त वेळेत एबी फाॅर्म जोडू न शकल्यामुळे तो अपक्ष अर्ज झाला. यावेळी भाजप नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या भाजपप्रवेशाच्या आॅफरवर भाष्य करताना तांबे म्हणाले. मी अपक्ष उमेदवार असून यापुढेही अपक्षच राहणार आहे. तसेच मला सर्व पक्ष आणि १०० हून अधिक संघटनांचा पाठिंबा असल्याचं जाहीर करतानाच पक्ष, मतभेद वगैरे बाजूला ठेवून जर लोक मला साथ देत असतील तर ते चांगलंच आहे असंही तांबे यांनी म्हणाले.

Satyajeet Tambe
Bihar Politics: 'मरण आले तरी चालेल पण, मी भाजपमध्ये..'; नितीश कुमार यांचे मोठं विधान

मागील दहा पंधरा दिवसांत जे काही राजकारण झालं. आमच्या कुटंबाला काही लोकांनी अर्धसत्य ठेवून बाजू मांडत आऱोपीच्या पिंजर्यात उभं केलं. त्यावर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण शब्दाला शब्दाने उत्तर दिल्यानं वाद वाढतो, तो वाढू नये. पण योग्यवेळी सर्व गोष्टी उघड करणार आहे. आणि त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र, काँग्रेसमधील नाहीतर पक्षातील काही लोकांकडून जे काही आरोप करण्यात आले. वेळ आल्यावर आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे. ज्यावेळी पूर्णसत्य सांगेल त्यावेळी चकीत व्हाल असेही तांबे यावेळी म्हणाले.

Satyajeet Tambe
Rahul Gandhi News: काश्मीरच्या जनतेने काय दिलं? बर्फवृष्टीत राहुल गांधींनी भाषणातून दिलं उत्तर

बाळासाहेब थोरात हे आजारी आहेत. त्यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे त्यांना हालचाल करता येत नाही. त्यांचे तीन फॅक्चर झाले आहेत. आणि त्यांचं साधंसुधं नाही तर मोठं आॅप्रेशन झालं नाही. जी व्यक्ती आधीच दु:खातून जात आहे तिला उगीच का त्रास द्यायचा म्हणून बोललो नाही. पण ते आमचे कुटुंबप्रमुख असल्याने योग्यवेळी त्यांच्याशी मी बोलेन असंही तांबे यांनी यावेळी सांगितले. पण राजकारणातील योग्यवेळ सांगता येत नसते असं म्हणत तांबेंनी त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com