Satyajeet Tambe: महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळविल्यानंतरही तांबेंचा जल्लोष नाही; काय आहे कारण?

Nashik News : ...पण विजयोत्सव साजरा करणार नाही!
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama

Nashik Graduate Constituency Result : ऐनवेळी बंडखोरी करत दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज, त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून आरोपांचे एकापाठोपाठ मानसिक खच्चीकरण करणारे हल्ले, समोर महाविकास आघाडीतील तीन बलाढ्य घटक पक्ष अशा सगळ्या आव्हानांना संयमाने सामोरे जात सत्यजीत तांबे यांनी विरोधी पक्षांचा करेक्ट कार्यक्रम केला.

निश्चितच तांबे यांच्यासाठी नाशिक पदवीधरमधील विजय सोपा नव्हता. पण त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पराभवाचा धक्का देत विजयश्री खेचून आणली. यानंतर तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषाची तयारीही केली होती. पण तांबे यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवत सर्वांचीच मनं जिंकली आहे. त्यांनी आपण विजयोत्सव साजरा करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतांची जुळवाजुळव, शिक्षक पदवीधर मतदारसंघातील विविध संघटना, संस्था, तसेच सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यांनी अक्षरश: मतदारसंघ पिंजून काढला होता. एकीकडे विरोधकांनी तांबे यांच्या पराभवासाठी मोट बांधत शुभांगी पाटील यांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी केल्यामुळे तांबेंसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं.

पण तांबे यांनी राजकीय कौशल्याच्या जोरावर नाशिक पदवीधर मतदारसंघातील एकवेळ अशक्यप्राय वाटणारा विजय अगदी सहज आवाक्यात आणला. याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या तीन बलाढ्य पक्षांनाही धूळ चारली. पण यानंतर सत्यजीत तांबे (Satyajeet tambe) विजयाचा मोठा जल्लोष करतील अशी आशा होती. पण त्यांनी कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचं आवाहन केलं आहे.

Satyajeet Tambe
Nashik Graduate Election : सत्यजीत तांबे यांच्या विजयात 'हे' घटक ठरले महत्वाचे

सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने महिला नेत्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत निवडणूक रंगत कायम राहिलेली पाहायला मिळाली. या लढतीत तांबे बाजी मारणार की शुभांगी पाटील विजयाचा चमत्कार घडविणार याकडं राज्याचं लक्ष लागलेलं होतं. ३० जानेवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकीचा अखेर निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत ६८ हजार ९९९ मतं मिळवत सत्यजित तांबे यांनी विजय संपादन केला आहे.

...पण विजयोत्सव साजरा करणार नाही!

सत्यजीत तांबे यांनी एक टि्वट केलं आहे.यात त्यांनी विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.

Satyajeet Tambe
Amravati : अमरावतीत नवा ट्विस्ट : तब्बल 8735 अवैध मतांची फेरमोजणी : भाजपची मागणी!

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकालात कोण बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असतानाच सत्यजित तांबे यांना एक मोठा धक्का बसला. तांबे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि नाशिक पदवीधर निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणारे नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे काल रात्री अपघाती निधन झाले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

''माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र..''

माझा पगार यांच्या निधनानंतर युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. "माझा खंबीर पाठीराखा, सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे असं तांबे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com