Satyajit Tambe Politics: सत्यजित तांबे यांनी केले फडणवीसांचे कौतुक, विरोधकांच्या भुवया उंचावल्या.

Satyajeet Tambe; Satyajit Tambe praised CM Devendra Fadnavis-आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याचे केले कौतुक.
Satyajeet Tambe & Devendra Fadanvis
Satyajeet Tambe & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Satyajeet Tambe News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर विरोधकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र याच दौऱ्यावरून आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार सत्यजित तांबे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या आणि विशेषता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाचे कौतुक केले. सामान्यांचे प्रश्न मांडताना त्यांनी हे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार काम करील असा विश्वास व्यक्त केला.

Satyajeet Tambe & Devendra Fadanvis
Bhaskar Bhagare Politics: खासदार भास्कर भगरेंचा सवाल; केंद्र सरकार कांदा निर्यात शुल्क केव्हा रद्द करणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी १५.७० लाख कोटींचे करार केले. या करारामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेल. राज्याचा विकास होईल असा विश्वास त्यांनी केला.

Satyajeet Tambe & Devendra Fadanvis
Kirit Somaiya Politics: मालेगावातून एक हजार बांग्लादेशी पळाले! किरीट सोमय्या यांनी गृहखात्यालाच घेरले?

ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा करार करताना केवळ मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या पारंपरिक शहरांचा विचार केलेला नाही. गडचिरोली सारख्या दुर्गम आणि मागास जिल्ह्यातही गुंतवणुकीसाठी करार करण्यात आला आहे. त्यांच्या या दौऱ्यात राज्याचा समतोल विकास हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे.

गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक प्रकारची सरकारे आली. अनेक युती झाल्या आणि बिघडल्या. अनेकांच्या आघाड्या झाल्या. यातून राजकीय गोंधळ झाला. त्याने या महाराष्ट्राच्या भवितव्याविषयी मोठी चिंता सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सध्या राज्याचे राजकारण अस्थीर असल्याने सगळ्यांनाच त्याची चिंता आहे.

यासंदर्भात महाराष्ट्राला या गोंधळातून बाहेर काढून दिशा देण्याचे काम फक्त मुख्यमंत्री फडणवीस हेच करू शकतात. राज्यातील लहान मुलांना विचारले तरीसुद्धा ते महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम फडणवीस हेच करतील, असे सांगतील असा दावा आमदार तांबे यांनी केला.

आमदार तांबे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. विशेषता शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम हा प्रशासन आणि सामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या ठरेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार तांबे यांनी केलेले भाषण हे भाजपच्या आमदारालाही मागे टाकेल असेच वाटत होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांची केलेली स्तुती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com