सयाजी शिंदे लवकरच भेटणार मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना...

रोपांची बँक तयार करुन त्याला सह्याद्री वृक्ष बँक असे नाव देण्यात यावे, अशी संकल्पना असल्याचे सयाजी शिंदे म्हणाले.
सयाजी शिंदे लवकरच भेटणार मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना...
Published on
Updated on

जळगाव : शासनाच्या रोपवाटिकेत बदल करण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक ठरेल अशा झाडांच्या रोपवाटिका तयार करण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची लवकरच भेट घेणार आहोत, अशी माहिती अभिनेते व सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी दिली.

सयाजी शिंदे लवकरच भेटणार मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना...
जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचा वरचष्मा टिकेल का?

जळगाव येथे मराठी प्रतिष्ठान व जळगाव महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मेहरुन तलाव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन, मराठी प्रतिष्ठानचे विजय वाणी, अॅड. जमिल देशपांडे आदी उपस्थित होते.

सयाजी शिंदे लवकरच भेटणार मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंना...
अभिनेते सयाजी शिंदेंच्या मागणीमुळे फडणवीस सरकारची वृक्ष लागवड अडचणीत

यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले, राज्यातील शासनाच्या रोपवाटिकेत बदल करण्याची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात शेतीपूरक पर्यावरण जोपासणारी झाडे लावण्याची गरज आहे. त्या दृष्टीने रोपवाटिका प्रत्येक जिल्ह्यात तयार करण्यात याव्यात, तसेच, शासनाने सामाजिक वनीकरणात वृक्षाच्या रोपांची बँक तयार करुन त्याला सह्याद्री वृक्ष बँक असे नाव देण्यात यावे, अशी आपली संकल्पना आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्री यांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती देऊन अमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठी प्रतिष्ठानच्या वतीने जळगावात राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तर, जळगाव येथून वृक्षारोपण करण्याची प्रेरणा घेऊन जात असल्याचे मत सयाजी शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com