Eknath Shinde politics: मुख्यमंत्री म्हणाले, भाजपच्या आमदार सीमा हिरे ही तर माझी लाडकी बहीण!

Seema Hire Politics; CM Eknath Shinde call BJP MLA Seema Hiray dear sister-सिडको परिसरातील वावरे नगर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शनिवारी झाले.
Seema Hiray, Eknath Shinde & Alka Ahire
Seema Hiray, Eknath Shinde & Alka AhireSarkarnama
Published on
Updated on

Seema Hire News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या नेत्यांचा हा व्यस्त दौरा पावसातच झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे विविध मंत्री शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. सकाळपासूनच शहरात पावसाचे वातावरण होते. या कार्यक्रमांची वेळ झाल्यावर देखील पावसाची उघडझाप सुरूच होती.

पावसाचा परिणाम या नेत्यांच्या कार्यक्रमांवर देखील झाला. विशेषतः शहरातील भाजपच्या आमदारांच्या कार्यक्रमांना पावसाचा फटका बसला. आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघातील लोंढे पूल ते वावरे नगर या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते.

या कार्यक्रमाला योगायोगाने मुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित राहिले. मात्र याच सुमारास पाऊस सुरू झाला. त्यामुळे या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची व्यासपीठावरच कोंडी झाली.

Seema Hiray, Eknath Shinde & Alka Ahire
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांचे खडसेंना सडेतोड उत्तर, 'तुमचे राजकारण संपले'

हा भूमिपूजनाचा कार्यक्रम अक्षरशः उरकण्यात आला. कोणतेही स्वागत, प्रास्ताविक, भाषण किंवा अन्य सोपस्कार यावेळी झाले नाही. भाजपच्या आमदार हिरे यांनी या नेत्यांचे गुच्छ देऊन स्वागत केले.

पावसाचे वातावरण आणि कार्यक्रमाला झालेली गर्दी याचा अंदाज घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतेही भाषण न करता थेट आता मुख्यमंत्री या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील, असे सांगितले. पावसाचे वातावरण असल्याने अन्य कार्यक्रमांना जावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांच्या या सुचनेमुळे अनेकांची निराशा झाली. विशेषतः भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चांगलीच नाराजी दिसून आली. अनेकांनी ती बोलून देखूल दाखवली. त्यातील काहींनी या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Seema Hiray, Eknath Shinde & Alka Ahire
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांच्या मतदारसंघात भाजपच्या गुजरात निवडणूक टीमने ठोकला तळ, हे आहे कारण...

मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील परिस्थितीचा अंदाज घेत थेट दोन-तीन ओळींत हा विषय मिटवला. ते म्हणाले, राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. सर्व नागरिक तिची चर्चा करतात. महिला या योजनेवर खुश आहेत.

भाजपच्या आमदार सीमा हिरे यादेखील माझ्या लाडक्या बहीण आहेत. त्यांना रस्त्याच्या कामासाठी वीस कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्या माझ्या लाडकी बहीण असल्याने आणखीही निधी लागला तर, तो कमी पडू देणार नाही. आणखी निधी सुद्धा देऊ असे सांगत कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

यावेळी आमदार डॉ राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. अनेक कार्यकर्ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गुच्छ घेऊन आले होते त्यांना हे गुच्छ तसेच परत न्यावे लागले.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com