'...तर राज्यातील जनता ॲड. गुणरत्न सदावर्तेंना डोक्यावर घेऊन नाचेल'

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांच्या डोक्यातील संभ्रम काढून त्यांना कामावर पाठवावे असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
Gulabrao Patil-Gunaratna Sadavarte
Gulabrao Patil-Gunaratna SadavarteSarkarnama

जळगाव : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगार संघटनेचे नेते हे वकील आहेत. त्यांना सर्व परिस्थिती माहित आहे. त्यांनी एसटी कामगारांच्या डोक्यातील संभ्रम काढून त्यांना कामावर पाठवावे, असे माझे त्यांना आवाहन आहे. त्यांनी संपावर तोडगा काढून कामगारांना कामावर पाठवले, तर राज्यातील जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल, असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एसटी कामगारांच्या संपावर तोडणा काढण्यासाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. (Send ST workers to work : Gulabrao Patil's Appeal to Adv. Gunaratna Sadavarte)

राज्यातील एसटी कामगार गेल्या दिवाळीपासून राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर आहेत. ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली न्यालयालयात हा लढा लढला जात आहे. सरकारने पगारवाढ करूनही कामगार संपावर येत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एसटी कामगारांनी ३१ मार्चपर्यंत संप मागे घेऊन कामावर यावे,’ असे आवाहन केले होते. त्याबाबत जळगावचे पालकमंत्री पाटील बोलत होते.

Gulabrao Patil-Gunaratna Sadavarte
भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांना धक्क्यावर धक्के : आक्रमक युवा नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश!

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एसटी कामगार संपाचा आता अतिरेक होतो आहे. राज्यातील शाळेत जाणाऱ्या मुली आणि शेतकरी बांधव हे तुमचेच आहेत. त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. राज्य सरकार तुम्हाला कामावर येण्याचे आवाहन करत आहे. तुमच्याशी चर्चा करत आहे. न्यायालयाचा आणि समितीचा निर्णय झाला आहे, त्यामुळे आतातरी कामगारांनी विचार करावा. कामगारांनी आपली मागणी कायम ठेवत कामावर यावे. हिंदू धर्माचा पवित्र सण असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी कामावर हजर व्हावे, अशी माझी त्यांना विनंती आहे.

Gulabrao Patil-Gunaratna Sadavarte
घरावरील हल्ल्यानंतर केजरीवाल म्हणाले, ‘देश के लिए मेरी जान भी हाजिर...’

कामगारांना घरदार आहे. कुटुंब आहे, याचाही त्यांनी विचार करावा. नेते त्यांना चुकीचा मार्ग दाखवित आहेत. आपल्या मागण्या मान्य होतील, या भावनेच्या भरात कामगारही त्यांच्या मागे जात आहेत. त्यांच्या या संपात काही हजार कामगार आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आपल्या मागण्या त्यांनी लावून धरल्या पाहिजेत. पण, त्यांनी आता कामगारांच्या डोक्यात असलेला संभ्रम काढून कामगारांना कामावर हजर व्हावे, असे सांगितले पाहिजे, अशी मागची अपेक्षा आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com