Sharad Pawar: पुत्राच्या विजयासाठी माजी आमदारानं सोडली शरद पवारांची साथ! भाजपचा प्रचार करणार

Udesing Padvi Resign Sharad Pawar NCP: बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरने येऊन शहादा व नंदुरबार येथील बंडखोरी थांबवली. त्यांना इतर जागा दिसल्या नाही का. त्यांच्यात काहीतरी डील झाली असेल," असा आरोप उदेसिंग पाडवी यांनी केला.
Udesing Padvi | Sharad Pawar
Udesing Padvi | Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Shahada Vidhansabha Election: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष, माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी आपल्या 91 पदाधिकाऱ्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उदेसिंग पाडवी हे त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांचा प्रचार करणार आहेत. राजेश पाडवी हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.

तळोदा येथील आजी- माजी आमदार असलेल्या पिता-पुत्रांमधील अनेक वर्षाची कटूता दूर झाली आहे. तळोद्यातील हे पिता पुत्र कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. आता लेकाच्या मदतीसाठी बाप धावून आला आहे. आजी-माजी आमदार एकत्र आल्याने काँग्रेसची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी बंडखोरी थांबवली असली तरी अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात महाआघाडीमध्ये दिसत आहे.

Udesing Padvi | Sharad Pawar
Pune Election: मुख्यमंत्र्यांची सभा, अजितदादांचा मेळावा तर सुप्रियाताईंची रॅली; पुण्यात सभांचा धुरळा

"जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. मात्र बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरने येऊन फक्त शहादा व नंदुरबार येथील बंडखोरी थांबवली. त्यांना इतर जागा दिसल्या नाही का. त्यामुळे याच्यात काहीतरी डील झाली असेल म्हणून बाळासाहेब थोरात आले," असा आरोप माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला.

शहादा-तळोदा मतदारसंघासाठी महाआघाडीतर्फे काँग्रेसकडून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आलेले राजेंद्रकुमार गावित यांना उमेदवारी देण्यात आली. या उमेदवारीला विरोध करीत महाआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे तिकिटासाठी तीन कोटी घेतल्याचा आरोप केला होता.

Udesing Padvi | Sharad Pawar
Nandurbar Election: पक्ष कुठलाही असो, आमदार एकाच घराण्यातील! गावित परिवाराचा बोलबाला, 4 जण निवडणुकीच्या रिंगणात

या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बंडखोरी झाली होती. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरने नंदुरबार येथे आले. त्यांनी बंडखोरांना अर्ज माघार घेण्यास सांगितले. बंडखोरांनी अर्ज माघार घेतला.

आम्ही पक्षाच्या राजीनामा दिला असून आता कुठल्या पक्षात जाणार नाही, आजपासून भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी विविध सभा घेत गावित परिवारावर टीका केली होती. मात्र विधानसभेत गावित परिवारावर कुठलीही टीका करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Udesing Padvi | Sharad Pawar
Baramati Politics: बारामतीत किती लीड? अजितदादा म्हणाले, "शंभर टक्के सांगतो..."

शहादा विधानसभेत 2014 मध्ये माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा पराभव करत उदेसिंग पाडवी भाजपाकडून निवडून आले होते. मात्र 2019 मध्ये त्यांचे तिकीट कापत त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली.

उदेसिंग पाडवी यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला व नंदुरबार विधानसभा लढवली. त्यावेळी त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. उदेसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला त्यावेळेस उदेसिंग पाडवी हेही राष्ट्रवादीमध्ये गेले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com