RajendraKumar Gavit: उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा राजीनामा; 'तुतारी' फुंकणार?

BJP Vice President RajendraKumar Gavit resigns from BJP: मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असल्याचे राजेंद्रकुमार गावित यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट करत आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले होते.
RajendraKumar Gavit
RajendraKumar GavitSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News: विधानसभेपूर्वी नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे. आगामी विधानसभेसाठी तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे ते बंधू आहेत.

विधानसभेत शहादा-तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असल्याचे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट करत आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले होते. त्यांनी आज राजीनामा दिला आहे. ते विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. पण पक्षात राहून तिकीट मिळणार नाही, याची जाणीव झाल्यानं त्यांनी राजीनामा दिला आहे.

राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या ठिकाणी सध्या भाजपचेच राजेश पाडवी हे आमदार आहेत. त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच गावित यांनी भाजपमधील पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर नंदूरबारमध्ये भाजपला धक्का बसला आहे.

RajendraKumar Gavit
Mahayuti News: CM शिंदेंचा फडणवीसांना धक्का; जिल्हासचिवासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

विधानसभा लढवण्याचा चंग...

2014 मध्ये गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा जवळपास साडे अकराहजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. पण भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही. राजेश पाडवींना तिकीट मिळालं. त्यांनी निवडणूक जिंकली. नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक लढवण्यासही ते इच्छुक होते. नंदूरबार लोकसभेसाठी त्यांनी मुलाखतही दिली होती. पण त्यात त्यांना अपयश आलं. पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही. आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.

RajendraKumar Gavit
Shiv Sena News: ठाकरे-शिंदे गटात दिलजमाई; माजी आमदाराचा असाही दिलदारपणा

शैक्षणिक संस्थांचं जाळं..

राजेंद्रकुमार गावित यांना मानणारा एक मोठा वर्ग शहाद्या शहरात आहे. शैक्षणिक संस्थांचं जाळं पाठीशी असल्यानं त्यांच्या नावाला वलय आहे. त्यामुळे गावित अन्य पक्षात गेल्यास किंवा अपक्ष लढल्यास भाजपला फटका बसू शकतो. धनगर आरक्षणाबद्दल महायुतीनं घेतलेली भूमिकादेखील गावित यांच्यासाठी डोकेदुखी धरली होती. नंदूरबार आदिवासी जिल्हा असल्यानं महायुतीच्या भूमिकेचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या सगळ्या बाबी लक्षात घेत गावित यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातं.

विकासाला चालना देणारा आमदार हवा...

शहादा-तळोदा मतदारसंघात राजेंद्रकुमार गावितांनी दोनच आठवड्यांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. बोरदमध्ये झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील समस्यांबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. मतदारसंघात गावगुंडांची दादागिरी सुरु असल्याची तक्रार अनेकांनी केली. मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारा आमदार हवा, अशी साद कार्यकर्त्यांनी गावित यांना घातली.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com