Nashik News: शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना लढायला शिकवले

शंतकरी संघटनेतर्फे करंजगाव (ता. निफाड) येथे शरद जोशी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
Sharad Joshi jayant at Niphad
Sharad Joshi jayant at NiphadSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शरद जोशी (Sharad Joshi) यांनी शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या हिताचा विचार करण्याची प्रेरणा दिली. शेतमालाला (Agreeculture produce) योग्य भाव मिळावा यासाठी जागृत केले. आपल्या अधिकारासाठी प्रस्थापितांच्या यंत्रणांविरोधात लढायला शिकवले. त्यामुळे शरद जोशी यांचे कार्य शेती व शेतकरी दोघांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन करंजगाव (Niphad) येथे झालेल्या कार्यक्रमता विविध संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केले. (Farmers pay homage to Sharad Joshi at Karanjgaon)

Sharad Joshi jayant at Niphad
MVP Election: छगन भुजबळांकडून मविप्र पदाधिकाऱ्यांचा सत्कार

शेतकरी संघटनेचे प्रणेते (कै.) शरद जोशी यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त करंजगाव येथे त्यांना शेतकरी संघटनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या करंजगाव (ता. निफाड) येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Sharad Joshi jayant at Niphad
Dada Bhuse: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्री भुसे थेट बांधावर !

यावेळी प्रसाद देशमुख प्रमुख पाहुणे होते. यावेळी त्यांनी शरद जोशी यांच्या संघर्षमय जीवन व शेतकरी संघटनेच्या चळवळीचा प्रवास सांगितला. शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते शांताराम (अण्णा) पावशे यांनी शरद जोशी यांच्या सोबत केलेल्या शेतीच्या लढ्यातील आठवणी सांगितल्या.

यावेळी भीमराव कोटकर यांनी संघटना बांधणीसाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. शेतीचे अनेक प्रश्न आहेत. त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करावी लागले. शासकीय यंत्रणा व केंद्र व राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल घेण्यास तयार नाही. त्यासाठी आपल्याला ताकद दाखवावी लागेल. त्यासाठी नव्या पिढीतील तरुण शेतकऱ्यांनी याबाबत पुढे आले पाहिजे, असे सांगितले.

कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राम राजोळे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश राजोळे, माधव टिळे, आण्णा पवार, पोपट राजोळे, अर्जुन भगुरे, रमेश राजोळे, रामनाथ टिळे, बाळासाहेब पावशे, प्रभाकर लचके, सरपंच नंदु निरभवणे, सोसायटी चेअरमन बाळासाहेब दराडे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन विवेक बर्वे यांनी केले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com