Sharad Pawar : जामनेर मध्ये 'हा' उमेदवार ठरणार निलेश लंके प्रयोगाची पुनरावृत्ती!

Jamner Assembly Constituency: भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय `धनशक्ती विरुद्ध जनशक्ती`चा प्रयोग!
Dilip Khodpe, Nilesh Lanke & Girish Mahajan
Dilip Khodpe, Nilesh Lanke & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची रविवारी जामनेर मतदार संघात सभा झाली. यावेळी त्यांनी नगर मधील निलेश लंके प्रयोगाचा आवर्जून उल्लेख केला. त्याची पुनरावृत्ती जामनेर मध्ये होणार, असा दावा पवार यांनी केला.

नगर लोकसभा मतदारसंघात प्रस्थापित धनाढ्य, बलाढ्य उमेदवाराचा एका साध्या कार्यकर्त्यांनी पराभव केला. निलेश लंके हे त्या उमेदवाराचे नाव. असाच चमत्कार यंदा जामनेरचे मतदार घडवतील आणि आपल्या जामनेर मतदार संघाचे नाव सबंध महाराष्ट्रात उज्वल करतील असे शरद पवार म्हणाले.

Dilip Khodpe, Nilesh Lanke & Girish Mahajan
Sharad Pawar : "नरहरी झिरवाळ विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही, सुनीता चारोस्कर हजारपट भारी उमेदवार"

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जामनेर मतदार संघात सलग सहा वेळा आमदार असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात सामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची ही उमेदवारी चर्चेचा विषय आहे. श्री खोडपे जिथे जिथे प्रचाराला जातात, तिथे मतदार त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करतात. त्यांना देणग्या देतात आणि आपले समर्थन देखील देतात.

Dilip Khodpe, Nilesh Lanke & Girish Mahajan
Sharad Pawar : रावसाहेब दानवेंची कार्यकर्त्यांला 'फाईट'; शरद पवार म्हणाले, त्यांच्या पक्षात सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं याचं...

त्याची प्रचिती काल झालेल्या शरद पवार यांच्या सभेत देखील आली. श्री पवार यांची सभा होण्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पाचशे रुपयांपासून तर विविध रकमा देणग्या म्हणून दिल्या. शरद पवार यांचे भाषण संपल्यावर एका कार्यकर्त्यांनी आग्रह करून त्यांना थांबवले आणि खोडपे यांना 25 हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश पवार यांच्या हस्ते दिला.

श्री पवार यांनी देखील आपल्या भाषणात खोडपे यांचे हे वैशिष्ट्य आवर्जून सांगितले. या मतदारसंघात अनेक वर्ष आमदार आणि मंत्री असलेल्या नेत्याने काहीही केलेले नाही. येथे प्रचंड कापूस पिकतो. कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी गिरीश महाजन यांनी आंदोलन केले. मात्र ते सत्तेवर असताना कापसाला सहा हजार रुपये भाव देखील मिळत नाही.

कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल आहे. पाच वर्षांपूर्वी येथे टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा झाली. मात्र त्याची साधी वीटही रचली गेली नाही. कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत असताना भाजप सरकारने 22 लाख गाठी प्रदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शेतकरी विरोधी धोरण राबवणारे नेते आणि त्यांचा पक्ष शेतकऱ्यांचे हित सहन करू शकत नाही.

शेतकरी विरोधी भाजपच्या महाजन यांच्या विरोधात एक अतिशय साधा मात्र, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारा आणि शिक्षकी पेशातील सामान्य कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला आहे. ज्या पद्धतीने जनता त्याचे स्वागत करीत आहेत, ते पाहता नगर मधील निलेश लंके प्रयोगाची आठवण येते.

यंदा जामनेरचे मतदार असा चमत्कार करतील की, एका बलाढ्य उमेदवार पुढे सच्चा आणि प्रामाणिक साधारण कार्यकर्त्याला आपला पाठिंबा देऊन महाराष्ट्रभर जामनेर मतदार संघाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com