Jarange Patil Politics: `वस्तादा`च्या डावाने भुजबळांच्या अडचणी वाढल्या; ज्यांनी येवल्यात आणले, त्यांच्याशीच आता संघर्ष!

Sharad Pawar; Chhagan Bhujbal will face Maratha candidate in Yeola, jarange effect-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी
Manikrao Shinde, Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Manikrao Shinde, Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: येवल्याची निवडणूक म्हणजे "अर्थ", "भुज" आणि बरेच काही "बळ" ठरलेले असते. यंदाही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून तशी पुरेशी तयारी आहे. मात्र या तयारीला एक सामान्य उमेदवार आव्हान देणार आहे.

राज्यातील अनेक उमेदवार आणि मतदारसंघ चर्चेत आहेत. मात्र या सर्व मतदारसंघांपैकी येवला हा मतदारसंघ सबंध महाराष्ट्रात चर्चेत आहे. हा मतदारसंघ राज्यातील ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहे.

यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने असेच संकेत देत आहे. कारण येवला मतदारसंघातील ही निवडणूक मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची क्रेडिबलिटी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे डावपेच आणि छगन भुजबळ यांचा निवडणूक मंत्र या सगळ्यांची परीक्षा पाहणारी ठरणार आहे.

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे भुजबळ हे उमेदवार आहेत. ते सर्व अर्थाने प्रबळ आहेत. त्यांची मतदारांपर्यंत पोहोचणारी एक खास यंत्रणा आहे. `सर्व` कामात त्यांची ख्याती आहे. अशा सर्वर्थाने प्रबळ उमेदवारापुढे शरद पवार यांनी माणिकराव शिंदे हा एक सामान्य उमेदवार दिला आहे.

Manikrao Shinde, Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Dr Rahul Aher Politics: डॉ राहुल आहेर यांचे भाऊ केदा आहेर यांना सडेतोड उत्तर, दिला थेट इशारा...

माणिकराव शिंदे हे येवला मतदारसंघातील एक सर्वपरिचित आणि तळागाळातील लोकांशी संपर्क असलेले व्यक्तिमत्व आहे. सहकार आणि येवला नगरपालिकेसह विविध संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते सक्रिय राहिले आहेत. यंदा ते मनोज जरांगे पाटील यांची पसंती आणि शरद पवार यांची निवड म्हणून उमेदवारी करीत आहेत.

गंमत म्हणजे वीस वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघातून राजकीय पुनर्जन्म झाला. त्यात श्री शिंदे हे भुजबळ यांचे निमंत्रक होते. त्यांनीच भुजबळ यांना येवल्यात आणले. योगायोग म्हणजे वीस वर्षांनी भुजबळ यांना येवल्यात आणणारे शिंदे आता त्यांच्या विरोधात उमेदवारी करीत भुजबळ यांना `तुम्ही आता येवल्यात नको` असा संदेश देऊ पाहत आहे.

हे सर्व घडले ती एक प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक चर्चा आणि वादविवादाची प्रतिक्रिया देखील आहे. या मतदारसंघातून उमेदवार कोण? यासाठी मराठा आरक्षणात भूमिका घेणाऱ्या विविध कार्यकर्त्यांनी इच्छुक म्हणून मैदानात उडी घेतली होती.

Manikrao Shinde, Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Radhakrishna Vikhe : संगमनेरच्या हिंसाचारावर मंत्री विखेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले 'षडयंत्र अन्..'

येवल्याच्या राजकीय परंपरेप्रमाणे यातील प्रत्येकाचे एकमेकांशी अजिबातच जमले नाही. दुसरा अगदी बाहेरचाही चालेल पण आपल्यातला अन्य कोणी नको, या राजकीय भूमिकेने हे सर्व उमेदवार बाद झाले.

यामध्ये शरद पवार यांनी अतिशय विचारपूर्वक कुणाल दराडे हे भुजबळ यांना आव्हान देऊ शकेल असा एक पर्याय दिला होता. मात्र त्यावर मनोज जरांगे पाटील यांची संमती ते मिळवू शकले नाही. येवल्यात ओबीसी भुजबळ यांच्याविरुद्ध ओबीसी दराडे अशी रंगतदार लढत यामुळे टळली.

जरांगे पाटील यांच्या आग्रहामुळे भुजबळ यांच्या विरोधात मराठा उमेदवारच देण्याचा निर्णय झाला. आताही लढत स्पष्ट आहे. सर्वार्थाने प्रबळ छगन भुजबळ आणि त्यांच्याविरुद्ध सामान्यांचे प्रतिनिधी म्हणून माणिकराव शिंदे यात मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते आणि इच्छुक किती मनापासून मैदानात उतरतात याची उत्सुकता आहे.

ही निवडणुकीत मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोघांच्याही प्रतिमा आणि प्रतिष्ठेचा निर्णय लागणार आहे. त्या दृष्टीने छगन भुजबळ यांची ही पाचवी निवडणूक सर्व अर्थाने वेगळी आणि राजकीय भवितव्य ठरविणारी असेल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com