Jalgaon Political News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी पायाला भिंगरी बांधल्याचे दिसून येत आहे. दिवसभर विविध मतदारसंघात जाऊन आपल्या उमेदवारांसाठी सभांचा धडाकाच या नेत्यांनी लावला आहे.
यात ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar हेही आघाडीवर आहेत. ते जळगावच्या दौऱ्यावर असताना शुक्रवारी (ता. 3) पवारांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात कुणालाही दुखापत झाली नाही, वाहनांचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस NCP शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांची चोपडा येथे सभा होती. ती सभा संपल्यानंतर ते भुसावळ - यावल मार्गावरून भुसावळकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला आहे. यात कुणालाही दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चोपडा येथील सभा आटोपून पवार हे भुसावळ-यावल रस्त्यावरून भुसावळकडे जात होते. ते यावल तालुक्यातील रस्त्यावर असताना त्यांच्या वाहनाच्या समोर गतीरोधक आले. त्यावेळी चालकाने अचानकच वाहनाची वेग कमी केला. याचा आंदाज मात्र मागून येणाऱ्या वाहनचालकांना आला नाही. परिणामी ताफ्यातील शेवटच्या एका वाहनाने पुढील वाहनास धडक दिली. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र संबंधित दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.