नाशिक : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ॲड. नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलने घवघवीत यश संपादन केले. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. (Sharad Pawar, Nashik Latest News)
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे,आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रा. बाळासाहेब पिंगळे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नूतन सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी.बी.मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालकांचा शरद पवार व छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतांना संस्थेवर ६० कोटी कर्ज आणि इतर देणं ७० कोटी असे १३० कोटीचे दायित्व असल्याचे समजल्यानंतर याबाबत शरद पवार यांनी चिंता व्यक्त करून संस्थेला आधी कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने संस्थेचे दायित्व कमी करण्यासाठी १ कोटीची देणगी त्यांनी जाहीर करून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वत:पासून सुरवात करून आपआपल्या रकमा संस्थेसाठी जमा करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी छगन भुजबळ, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येकी ५ लाखाची तर देविदास पिंगळे आणि विश्वस्तांनी प्रत्येकी लाख-लाख रुपयाची देणगी जाहीर केली. याप्रमाणे दीड कोटी रुपये जमा झाले. समाजाकडून देणग्या गोळा करून कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. संस्थेच्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
यावेळी संचालक सर्वश्री डॉ.सयाजीराव गायकवाड,रविंद्र देवरे, प्रविण जाधव, लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, संदीप गुळवे,अमित पाटील, डॉ. प्रसाद सोनवणे, रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, कृष्णा भगत, विजय पगार, रमेश पिंगळे,यांच्यासह संस्थेचे सनदी लेखापाल राजाराम बस्ते,विजय गडाख,अशोक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.