Sharad Pawar politics: भुजबळांविरोधात मोर्चेबांधणी, शरद पवार आज भुजबळ विरोधकांना काय कानमंत्र देणार?

Sharad Pawar politics; assembly election, Anti-Bhujbal aspirants meet Sharad Pawar Today-येवला मतदार संघातील छगन भुजबळ विरोधी इच्छुक उमेदवांराची आज मुंबईत बैठक
Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: येवला विधानसभा मतदारसंघात भुजबळ निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. या निवडणुकीत त्यांना विरोधकांचे मोठे आव्हान आहे. त्यात जरांगे फॅक्टर निर्णायक ठरू शकेल, असे बोलले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात अनेक इच्छुकांनी तयारी केली आहे. येवला मतदार संघातील या मंत्री भुजबळ विरोधकांची आज सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती काय असेल यावर चर्चा होईल.

यातील बहुतांशी इच्छुकांनी भुजबळ यांच्या विरोधात उमेदवारी बाबत एकमत कसे करावे यावर चर्चा सुरू केली आहे. मात्र यात प्रबळ उमेदवार कोण? याचे उत्तर भुजबळ विरोधकांना अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तयारी बाबत काय दिशा असेल? हा सध्या चर्चेचा विषय आहे.

मंत्री भुजबळ यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पक्षाच्या आणि अन्य नेत्यांना व त्यांच्या दौऱ्यांना हजेरी लावण्यापेक्षा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. मतदारसंघात नारपारचे पाणी पोहोचले. शनिवारी सुमारे सातशे कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन काल करण्यात आले.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : भाषणावेळी लागली हनुमान चालिसा; भुजबळ पोलिसांना म्हणाले, आवाज कमी करा नाहीतर...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री भुजबळ गेल्या चारही निवडणुकांमध्ये निवडणूक जाहीर होण्याआधी अनेक मोठ्या कामांचे भूमिपूजन करत असतात. विकास कामे केली असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यंदाही त्यांनी त्याची पुनरावृत्ती केली आहे त्याचा किती प्रभाव पडतो याची उत्सुकता आहे.

गेल्या चारही निवडणुकांमध्ये भुजबळ यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पाठिंबा होता. किंबहुना ते शरद पवार यांचेच उमेदवार होते. यंदा मात्र त्यांनी शरद पवार यांना राजकीय झटका देत बंडखोरी केली आहे. त्याचा परिणाम येवला मतदार संघात त्यांच्या विरोधकांना बळ देण्यात झाला आहे.

या संदर्भात आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत भुजबळ विरोधी इच्छुकांची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवा सुराशे, संजय बनकर, कुणाल दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे आणि गोरख पवार या बैठकीसाठी निरोप देण्यात आला आहे.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Balasaheb Thorat politics: नाशिकचा कोणता मतदारसंघ नाना पटोले, थोरात यांनी केला प्रतिष्ठेचा?

यावेळी येवला विधानसभा मतदार संघाची निवडणूक यंदा अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्या दृष्टीने श्री पवार सांगतील तो उमेदवार स्वीकारण्याची या सर्व इच्छुकांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत मंत्री भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघात काय राजकीय रणनीती असेल, याची चाचपणी होईल.

या बैठकीला विशेष महत्त्व आहे. महाविकास आघाडीच्या दृष्टीने येवला विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते पवार यांनी यापूर्वी येवला मतदार संघात दौरा केला आहे. नुकताच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही येथे मोठा मेळावा घेतला होता.

या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थक सावध झाले आहेत. यंदाची निवडणूक दोन्ही गटांसाठी अस्तित्वाचा प्रश्न असेल. त्यामुळे साम दाम दंड भेद आणि त्यापेक्षाही बरेच काही करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचा विचार होईल. त्या दृष्टीने आज भुजबळ यांच्या मतदारसंघात कोणती रणनीती वापरायची यावर महत्त्वाची चर्चा होईल.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com