Sharad Pawar on Vikhe: विखेंचा विषय पवारांनी एकाच वाक्यात संपवला; हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...

Nagar Lok Sabha Constituency 2024: मंत्री विखेंनी केलेल्या आरोपाकडे लक्ष वेधले असताना, शरद पवार यांनी मंत्री विखेंचे नाव घेण्याचेदेखील टाळले. 'तुम्ही ज्यांचे नाव घेता, त्यांच्यावर भाष्य करायला मला योग्य वाटत नाही', असे म्हणत शरद पवार यांनी मंत्री विखेंना फटकारले.
Sharad Pawar on Vikhe Patil
Sharad Pawar on Vikhe PatilSarkarnama

Nagar News: राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नगर जिल्ह्याचे राजकीय स्वार्थापोटी सर्वाधिक वाटोळे केल्याच्या आरोपांचा विषय एका वाक्यात शरद पवारांनी संपवून टाकला. "असे आहे की, महत्त्व द्याव्या, अशा व्यक्तींचा उल्लेख कालच मी सभेदरम्यान केला. परंतु तुम्ही ज्यांचे नाव घेता, त्यांच्यावर भाष्य करायला मला योग्य वाटत नाही", असे म्हणत शरद पवार यांनी मंत्री विखेंना फटकारले.

महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी (Nagar Lok Sabha Constituency 2024) जाहीर झाल्यापासून मंत्री विखे यांनी सातत्याने शरद पवार यांना लक्ष्य केले. नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये भांडणे लावून स्वतः स्वार्थ साधून घेतला. नगर जिल्ह्याचे सर्वाधिक वाटोळे कोणी केले असेल, तर शरद पवार यांनी केले आहे, असा गंभीर आरोप मंत्री विखे यांनी केला.

शरद पवार काल नगरमध्ये मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मंत्री विखेंनी केलेल्या आरोपाकडे लक्ष वेधले असताना, शरद पवार यांनी मंत्री विखेंचे नाव घेण्याचेदेखील टाळले. 'तुम्ही ज्यांचे नाव घेता, त्यांच्यावर भाष्य करायला मला योग्य वाटत नाही', असे म्हणत शरद पवार यांनी मंत्री विखेंना फटकारले. नगर दक्षिणमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढाई नसून, पवारविरुद्ध विखे, अशी लढाई आहे, असे मंत्री विखेंकडून सांगितले जाते.

यावर शरद पवार यांनी म्हटले, "येथून काही मी उमेदवारीचा अर्ज भरलेला नाही. मी निवडणूक लढवत नाही. उगाच स्वतःचे महत्त्व दुसऱ्या माणसाबरोबर नाव जोडून वाढवायचे, हे काही शहाणपणाचे लक्षण नाही". मंत्री विखे यांनी एका उद्योजकाला पाठवून नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी देऊ नका, असा निरोप दिला होता. हा उद्योजक कोण, असे विचारले असता शरद पवार यांनी हा उद्योजक नगरचा नसून, बाहेरचा आहे असे सांगितले. हे सांगताना शरद पवार यांनी त्यांचे नाव घेण्याचे टाळले.

Sharad Pawar on Vikhe Patil
Bhor News: भोरकरांची नाराजी कोणत्या पवारांना भोवणार? परिसरात लागले पोस्टर; 'नको आता MIDCचे गाजर...'

नामांतराबाबत स्थानिकांच्या ईच्छेचा सन्मान करतो

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसा मंत्रिमंडळातील बैठकीत ठरावदेखील मंजूर झाला आहे. परंतु कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. असे असले, तरी राजकीय नेत्यांनी अहिल्यानगर संबोधण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार म्हणाले, "हा निर्णय जो काही घेतला, स्थानिक जनतेची जी काही इच्छा आहे, तिचा सन्मान करणे योग्य आहे, अशी माझी भूमिका आहे".

महाविकास आघाडी ५० टक्केपेक्षा जास्त जागा जिंकेल

राज्यात महाविकास आघाडी किती जागा जिंकेल, यावर शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी सरकार जिंकेल, असे सांगितले. शरद पवार यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ या वेळी उपस्थित होते.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com