Manikrao Kokate Politics: एकीकरण राष्ट्रवादीचे... कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वर्चस्वाने उदय सांगळे नव्या पक्षाच्या शोधात?

NCP Unity Strained Uday Sangle Eyes Exit Over Kokate’s Hold :दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामुळे सिन्नरच्या राजकारणात अनेकांची कोंडी होणार.
Manikrao Kokate & Uday Sangle
Manikrao Kokate & Uday SangleSarkarnama
Published on
Updated on

NCP Sinnar Politics: निवडून आलेल्या शरद पवार पक्षाच्या आमदारांना निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जवळचे वाटू लागले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. या हालचालींनी निवडणुकीत पराभूत झालेले मात्र अस्वस्थ आहेत.

विधानसभा निवडणुकीत सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे अशी लढत झाली होती. त्यामध्ये श्री. सांगळे पराभूत झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बहुतांशी नेते चाचपडत असल्याचे चित्र होते.

Manikrao Kokate & Uday Sangle
Nilesh Lanke EVM : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम 'मॅनेज'च! दंगली घडवणाऱ्या नवहिंदूंवर खासदार लंकेंचा घणाघात

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्र यावेसे वाटते असे विधान केले होते. त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम दिसू लागले आहेत. सिन्नर मतदारसंघात या पक्षाचे पदाधिकारी आणि पराभूत उमेदवार अस्वस्थ असल्याचे चित्र आहे.

Manikrao Kokate & Uday Sangle
Sharad Pawar : नाथाभाऊ, अरुण गुजराथी म्हणतात, 'राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी शरद पवारांनी लवकर निर्णय घ्यावा!'

विधानसभा निवडणुकीनंतर माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषिमंत्री झाले. त्यामुळे सिन्नर मतदार संघात जे कोकाटे यांच्याशी जमवून घेतील त्यांचेच राजकीय भवितव्य बरे दिसते. संदर्भात सिन्नरच्या राजकारणात सामाजिक संदर्भ देखील आहेत. यामध्ये कृषी मंत्री कोकाटे आणि उदय सांगळे हे परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. दोन्ही पक्ष एकत्र झाल्यास सांगळे यांचे राजकीय भवितव्य काय हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्यावर श्री सांगळे यांनीही आपल्या वेगळा मार्ग शोधण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते. श्री सांगळे यांनी मध्यंतरी पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या भाजप मंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात सिन्नरच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.

श्री. सांगळे हे शिवसेना ठाकरे पक्षात कार्यरत होते. मात्र लोकसभा निवडणुकीचा विचार करता त्यांनी माजी खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर मात्र राज्यातील राजकीय सूत्रे बदलली. महायुती लोकसभेत प्रभावी ठरली.

त्यात सिन्नर चे राजाभाऊ वाजे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. श्री वाजे यांच्याशी देखील सांगळे यांचा दुरावा आहे. अशा परिस्थितीत खासदार आणि आमदार अर्थात मंत्री दोघांशीही जमत नसल्याने आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार करता श्री सांगळे यांना आपला वेगळा मार्ग निवडणे अपरिहार्य झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेने साखरे यांना ही संधी चालून आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com