Ram Shinde On Sharad Pawar: '' शरद पवारांनीच सर्वात पहिल्यांदा शिवसेना फोडली!''; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा...
Ram Shinde , Sharad Pawar
Ram Shinde , Sharad PawarSarkarnama

Bjp - Shivsena - Ncp News : शिवसेनेतील एकनाथ शिंदे व आणि ४० आमदारांच्या बंडखोरीमागे भाजप असल्याचा आरोप नेहमीच ठाकरे गटाकडून करण्यात येत असतो. तसेच भाजपनेच शिवसेना फोडली अशी टीकाही केली जाते. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तरही दिले जाते.मात्र, आता भाजप नेते व आमदार राम शिंदे यांनी राज्यात शरद पवारांनीच सर्वात पहिल्यांदा शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भाजपाचे नेते राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं. आजतागायत छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. संजय राऊत सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला पहिल्यांदा कोणी फोडण्याचा प्रयत्न केला आणि कोणी शिवसेना फोडली यावरही बोलायला हवं असंही राम शिंदे (Ram Shinde) यावेळी म्हणाले.

Ram Shinde , Sharad Pawar
Narendra Modi News; `या` शेतकऱ्याने नरेंद्र मोदींना लिहिले रक्ताने पत्र!

संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा असून त्यांनी सकाळ-दुपार-संध्याकाळ बोलून शिवसेनेचा कार्यक्रम केला. ते शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवारां(Sharad Pawar)चं काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची दुर्दशा झाली आहे. यातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेची लक्तरे उडाली आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहत आहे अशा शब्दांत आमदार राम शिंदे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

Ram Shinde , Sharad Pawar
Karad : सरकारला धोका असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नाही : बाळासाहेब पाटील

अमित शाह(Amit Shah) हे राष्ट्रीय नेते असून ते देशाचे गृहमंत्री आहेत. ते राज्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं संजय राऊतांचं काम राहिलेलं नाही. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ते जे बोलत आहेत त्याला कुठलाही आधार नाही. त्यामुळे राऊतांच्या टीकेला भाजप कधीही गांभीर्यांने घेत नाही असंही शिंदेंनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com