Graduate Constituency Election: काँग्रेसने नागपूरच्या निवडणुकीतून पळ का काढला?

नाशिक येथे आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षकभारतीने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला.
Satyajeet Tambe & Kapil Patil
Satyajeet Tambe & Kapil PatilSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) नागपूर (Nagpur) मतदारसंघात शिक्षकभारतीने काँग्रेसकडे (Congress) समर्थन मागितले. मात्र निर्णय घेताना त्या मतदारसंघात वेळकाढूपणा झाला. काँग्रेसने नागपूरच्या निवडणुकीतून पळ का काढला? हे समजत नाही. त्यांच्याकडून सत्यजित व डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांची फसवणूक करण्यात आली. स्वार्थासाठी हक्काची जागा गमावल्याचा आरोप आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केला. (MLC Kapil Patil blaim congress for delay in decision)

Satyajeet Tambe & Kapil Patil
Jalgaon News; खनिज वाहतूकीतील राजकीय वर्चस्व अडचणीत येणार?

आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत काल शिक्षक भारती संघटनेचा मेळावा येथे झाला. यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी सत्यजीत तांबे यांना पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. शिक्षण व शिक्षकांवर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील ही सर्वांत मोठी संघटना असल्याचा दावा त्यांनी केला.

Satyajeet Tambe & Kapil Patil
Shivsena news; राऊत प्रकरणात नीलेश राणे विरोधात शिवसेना आक्रमक

ते म्हणाले, विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असलेले सत्यजित तांबे यांच्याकडे संघटनकौशल्य आहे. शिक्षक, शिक्षण, दलित, आदिवासी, वंचित व पुरोगामी विचारांशी ते जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षकभारतीने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीमुळे पदवीधरांच्या आशा उंचावल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज शिक्षक लोकभारतीतर्फे कालिका मंदिरात कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. त्या वेळी आमदार पाटील यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, राज्यात शिक्षक लोकभारती ही शिक्षकांची संघटना सर्वांत मोठी आहे. संघटनेतर्फे सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यापूर्वी उपस्थित शिक्षक व पदवीधरांना पाठिंबा देण्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनीच हात वर करून समर्थन दिले.

सत्यजित तांबे यांना राजकारणात आणण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आपण डॉ. सुधीर तांबे यांना वारंवार सांगितले. त्या अनुषंगाने सत्यजित यांना उमेदवारी दिल्याने त्या माध्यमातून तरुणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सत्यजित हे उच्चशिक्षित, लेखक व उत्कृष्ट अनुवादक आहे. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव असून, संघटनकौशल्य हा त्यांचा आवडीचा विषय आहे. जिल्हा परिषदेतदेखील त्यांनी दहा वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले. डॉ. सुधीर तांबे यांना पंधरा वर्षांपासून मी ओळखतो. त्यांच्या कुटुंबीयांचा राजकीय इतिहास बघितला तर डाव्या विचारांचा वारसा त्यांनी जोपासला आहे.

डॉ. तांबे यांनी परिषदेमध्ये फक्त पदवीधरांचेच प्रश्न मांडले असे नाही, तर शिक्षक, शिक्षण, दलित, आदिवासी व वंचितांचे प्रश्नदेखील त्यांनी मांडले अन् तेवढ्याच ताकदीने सोडविले. पुरोगामी विचार हा तांबे कुटुंबियांचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही तांबे यांच्यासोबत असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.

तिथे काँग्रेसने पळ का काढला?

उमेदवारीवरून तांबे कुटुंबीयांची चुकीची प्रतिमा निर्माण केली जात आहे. सत्यजित यांच्यावर अन्याय झालाय, ही बाब लपविली जात आहे. ज्या आघाडीला आपण समर्थन दिले त्यांच्याकडून अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. शिक्षकभारतीचे प्रदेशाध्यक्ष अशोक बेलसरे, संघटनेचे पदाधिकारी अर्जुन कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com