

Shirur MD Drugs Case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभाराचे वाभाडे, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभाराने निघाली आहेत. शिरूर इथं गाजत असलेल्या दोन कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे अहिल्यानगर पोलिस दलापर्यंत येऊन पोहोचलीत.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या ड्रग्ज प्रकरणात, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर (वय 39, रा. नेप्ती, ता. नगर) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गृहखात्यात खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये दोन कोटी रुपयांचं एमडी ड्रग्जचं प्रकरण गाजत आहे. पुणे ग्रामीण स्थानिक शाखा पोलिसांनी याचा शोध घेतल्यानंतर, याचे पाळेमुळे अहिल्यानगरपर्यंत येऊन पोहोचली. अहिल्यानगर पोलिस (Police) दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर हा एमडी ड्रग्ज पुरवत होता, याची माहिती समोर आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला काल सायंकाळी अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेतून ताब्यात घेत अटक केली.
पुणे (Pune) पोलिसांच्या चौकशीत, श्यामसुंदर गुजर हा पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जमधून मुद्देमाल काढून बाहेर विकत होता, असे समोर आलं आहे. यानंतर पुणे अन् अहिल्यानगर पोलिसांनी श्यामसुंदर गुजर याच्या प्रतापाची चौकशी केली. या प्राथमिक चौकशीत, तो अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जमधून मुद्देमाल चोरून काढून बाहेर विकत असल्याचं समोर आलं.
पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर हा स्थानिक गुन्हे शाखेत नार्को टेस्टसाठी काम करायचा. अहिल्यानगर जिल्ह्यात जप्त झालेले ड्रग्ज, अंमली पदार्थांचा मुद्देमाल कक्ष त्याच्या ताब्यात होता. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र मुद्देमाल कक्ष आहे. या कक्षाची चावी मुख्यालयात जमा असते. ही चावी त्याच्याकडेच असायची. तसेच, या विभागाचा सर्व पत्रव्यवहार देखील तोच संभाळत होता. एवढ्या मोठ्या प्रकारामुळे त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे संकेत अहिल्यानगर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. यात पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याचा समावेश आहे. सुरवातीला पोलिसांनी 1 किलो 52 ग्रॅम ड्रग्ज पकडले होते. आता कारवाई करत पुन्हा 9 किलो 655 ग्रॅम ड्रग्ज पकडले आहे. एकूण मुद्देमाल 10 किलो 707 ग्रॅम ड्रग्जपर्यंत पोहोचला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरातील बाबूरावनगर भागात शनिवारी (ता. 17) मध्यरात्री शादाब रियाज शेख (वय 41) हा संशयास्पद फिरत असताना, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याच्या बॅगमधून सुमारे 2 कोटी 10 लाख रुपयांचे 1 किलो 52 ग्रॅम वजनाचे 'एमडी' ड्रग्ज सापडले.
पुणे ग्रामीण पोलिसांनी शादाब रियाज शेख याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर अहिल्यानगर पोलिस दलातील श्यामसुंदर गुजर याचे नाव समोर आलं. यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी काल सायंकाळी अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालयात येत, श्यामसुंदर गुजर याला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
श्यामसुंदर गुजर याला अटक केल्यानंतर अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक आणि स्थानिक गु्न्हे शाखा पोलिस निरीक्षकांच्या नाकाखाली डिचून हा कारभार सुरू होता, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व प्रकरणाची माहिती घेऊन, सायंकाळी बोलणार आहे, असे सांगितले.
अहिल्यानगरमधील श्रीरामपूर अन् संगमनेरमध्ये मध्यंतरी ड्रग्जचे प्रकरण चांगलेच गाजत होते. श्रीरामपूरमधील एमआयडीसीतील एका गोदामातून पोलिसांनी 14 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. या ड्रग्ज प्रकरणाचे पुढे धागेदोरे तेलंगणापर्यंत निघाली. हे जप्त केलेले ड्रग्ज देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.