(जळगाव : नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदाना अगोदर जळगावचे पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात भेट झाली होती, या भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीनं चर्चांना उधाण आलं आहे. पाटील-महाजन यांनी एकाच गाडीत बसत चर्चा केली. त्यामुळे आता पाटील-महाजन कोणती रणनिती आखत आहेत, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. (Gulabrao Patil Met Girish Mahajan)
जामनेरमध्ये काल पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्धघाटन झाले. त्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या घरी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) गेले. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. जळगाव जिल्ह्यात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप (BJP) शिवसेना (Shivsena) छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगली होती.
बोदवड नगरपंचायतीच्या निकालावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले होते की ’एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती (BJP-Shiv Sena alliance) होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले’
काल (२६ जानेवारी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट गिरीश महाजन यांच्या घरी हजेरी लावली. याठिकाणी त्यामुळे एकनाथ खडसे यांचा आरोप आणि गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची भेट यात ताळमेळ असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
बोदवड नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे, ऍड.रोहिणी खडसे, शिवसेनेला समर्थन दिलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून गिरीश महाजन यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालात चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. तर, एकनाथराव खडसे यांच्या गटाची सत्ता थोडक्यात हुकली होती.
विविध मुद्यावर राज्य सरकारच्या विरोधात महाजन हे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी काही कार्यकर्ते महाजन यांच्या घरी पोहोचले होते, सरकारच्या विरोधातील आंदोलनात गुलाबराव पाटील यांना बोलवायचं का? असा सवाल गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केला. महाजनांच्या या प्रश्नांना उपस्थितांमध्ये हशा पिकला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.