गुलाबराव पाटलांवरील टीका भोवली; ठाकरेंच्या नेत्याला जळगाव जिल्ह्यात भाषण बंदी

Jalgaon News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे.
Jalgaon Shivsena News
Jalgaon Shivsena Newssarkarnama

Jalgaon News : शिवसेना (Shivsena) ठाकरेगटाच्या युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी गेले दोन दिवस जळगाव जिल्ह्यात प्रबोधन यात्रेत आहेत. गेले दोन दिवसापासून जिल्ह्यातील सभेत त्यांचे जाहिर भाषण झाले. ते प्रभोक्षक भाषण करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी पोलीसांना निवेदनही देण्यात आले होते. त्याची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याना भाषणबंदी केली आहे.

या प्रकरणी पोलीस त्यांना नोटीस बजावण्यास गेले असताना त्यांना अटक केली जात असल्याचे वाटल्याने शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पोलीसाविरूध्द घोषणाबाजी सुरू केली आणि हॉटेलमध्ये एकच गोधंळ उडाला. पोलीस विरूध्द शिवसैनिक असे चित्र उभे राहिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे.

Jalgaon Shivsena News
Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, ‘तुम्ही’ आता हा विषय थांबवा...

त्यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळीही दौऱ्यात आहेत. गेल्या दोन दिवसात धरणगाव, पाचोरा येथे त्यांच्या यात्रेनिमित्त सभा झाल्या आहेत. धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्या मतदार संघातही सभा झाली. या वेळी शरद कोळी यांनीही जोरदार भाषण केले. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर टीका करतांना कोळी यांनी गुर्जर समाजावर टीका केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत समाजातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही निवेदन देण्यात आले होते.

निवेदनाची दखल घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक अमन मित्तल यांनी शरद कोळी यांना जिल्ह्यात भाषणबंदीचे आदेश बजावले. याबाबत पोलीसांनी नोटीस जारी ही नोटीस घेवून स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील हे शरद कोळी असलेल्या हॉटेल के. पी. प्राईड येथे ती बजावण्यासाठी गेले. त्या ठिकाणी पोलीस ही नोटीस बजावत असतांना शिवसेनेच्या कार्यकर्त्याना पोलीस कोळी यांना अटक करणार आहे असे वाटले, त्यामुळे त्यांनी एकच घोषणाबाजी सुरू केली.

पोलीस विरूध्द शिवसैनिक असे चित्र त्या ठिकाणी उभे राहिले आणि एकच गोंधळ सुरू झाला. पोलीसांनी भाषणबंदीची नोटीस बजावतांच शिवसैनिक संतप्त झाले, सुषमा अंधारे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुक संजय सावंत तसेच पदाधिकारी रस्त्यावर उतरून घोषणा देत पायीच शहर पोलीस त्यानंतर शिवसैनिक पोलीस स्टेशन बाहेर पडले.

Jalgaon Shivsena News
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा वनवा राज्यभर पेटणार...

महाप्रबोधन यात्रेच्या चोपडा येथील सभेसाठी निघून स्टेशनला गेले. त्या ठिकाणी त्यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंधा यांची भेट घेतली. कोळी कोणत्याही प्रकारे भाषण करणार नसल्याची ग्वाही सावंत यांनी पोलीसांना दिली. सोबत पोलीसांचा वाहनांचा ताफाही होता. दरम्यान धरणगाव पोलीस स्टेशनला शरद कोळी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यांना अटक होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com