Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, ‘तुम्ही’ आता हा विषय थांबवा...

अमरावती (Amravati) येथे आयोजित सभेत मी कुठलेही वाईट वक्तव्य केलेले नाही. सार्वजनिक आणि सामान्य माणसांसाठी बोललो. मीडियाने ते का दाखवले नाही, असा उलट सवाल बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

नागपूर : अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात गेले आठ दिवस खोक्यांवरून सुरू असलेल्या वादाचे खापर बच्चू कडू शेवटी मीडियावर फोडून मोकळे झाले आहेत. आठ दिवसांपासून तेच ते सुरू आहे. त्यामुळे मीडियाने हा विषय आता तरी थांबवावा, अशी विनंती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.

आज सकाळी मुंबईला (Mumbai) जाण्यासाठी विमानतळावर आले असता ते बोलत होते. पहिले तर मला मीडियाला सांगायचे आहे की आता हा विषय तुम्ही थांबवा. आमच्याकडून थांबवणे नाही झाले तरी मीडियाने मात्र हा विषय थांबवला पाहिजे. अमरावती (Amravati) येथे आयोजित सभेत मी कुठलेही वाईट वक्तव्य केलेले नाही. सार्वजनिक आणि सामान्य माणसांसाठी बोललो. मीडियाने ते का दाखवले नाही, असा उलट सवाल बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला. आम्ही प्रत्येक तालुक्यात एक शाळा दत्तक घेऊन आदर्श करणार, आमदार रवी राणांचे (Ravi Rana) आभारही मानले. ते दोन पावले मागे गेले तर मी चार पावले माघार घेईन असेही म्हणालो. पण, चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी मिळत नाही. आणि वाईट गोष्टी लगेच दाखवल्या जातात, असे कडू म्हणाले.

ती काय माझ्या एकट्याची जमीन नाही..

माझ्या मतदारसंघातील सापन प्रकल्पाला सुप्रमा दिली आहे. त्यामुळे २० हजार एकर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. आता चांगल्या गोष्टीकडे लक्ष देणार असल्याचे कडू यांनी सांगितले. अशा वादात लोकांचे प्रश्न मागे पडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण लोकांचे प्रश्न मार्गी लागतच आहेत. वीस हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. ती काय माझी एकट्याची जमीन आहे का, असा सवाल कडू यांनी केला.

Bacchu Kadu
मिटता मिटेना ‘कडू’वटपणा; बच्चू कडू राणांच्या तलवारीचे वार छातीवर झेलायला तयार...

मी चौथ्या वर्गाचा विद्यार्थी नाही..

बच्चू कडू आता चौथ्या वर्गातील विद्यार्थी नाही. माझेही वय ५१ वर्षे झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे यापुढे वादाचा विषय काढणार नाही. आम्ही एक तारखेपर्यत मागितलेले पुरावे आले नाही. त्यामुळे वादाचा विषय संपला आहे. राणा यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे आणि मीसुद्धा त्यांचे आभार मानले आहे. राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाईन, असे मी कालच सांगितले आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com