शिवसेनेचा आग्रह, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

बनावट लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांना शिवसेनेचे निवेदन
Shivsena delegation at Dhule police

Shivsena delegation at Dhule police

Sarkarnama

धुळे : देशाची राजमुद्रा असलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) प्रमाणपत्र थेट बनावट स्वरूपात तयार करून ते विक्री केल्या प्रकरणी धुळे महापालिकेच्या (Dhule) आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने (Shivsena) जिल्हा पोलिस (Police) अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

<div class="paragraphs"><p>Shivsena delegation at Dhule police</p></div>
मालेगाव स्फोटात गौप्यस्फोट; माजी IPS अधिकाऱ्याचे आर आर पाटलांकडे बोट!

शिवसेनेने म्हटले आहे, की जागतिक महामारी असलेल्या कोरोना काळातील संकटात महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे लस न देता ४०० ते ५०० रुपये घेऊन सरासरी आठ ते दहा हजार लसीकरणाची बोगस, बनावट प्रमाणपत्रे वितरित केली गेली आहे. ही गंभीर बाब आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यात प्रवास किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार आहे. या शासकीय आदेशाची अंमलबजावणी करणे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची अथवा त्या- त्या विभागाची जबाबदारी आहे.

<div class="paragraphs"><p>Shivsena delegation at Dhule police</p></div>
रोहिणी खडसेंवरील हल्ल्याने राजकारणाचा स्तर घसरला?

मात्र, येथील महापालिकेने बनावट लसीकरण प्रमाणपत्र विकण्याचा उद्योग सुरू केला. एसव्हीके नामक लसीकरण केंद्रावर एका दिवसात तब्बल दोन हजार ४०० बनावट प्रमाणपत्र देण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. सुटीच्या दिवशी लसीकरण केंद्र बंद असतानाही मनपाच्या महाभागांनी बनावट प्रमाणपत्र वाटप केले. लसीकरण केलेले नसताना बनावट प्रमाणपत्र दिल्यामुळे लसीच्या बाटल्या काळ्याबाजारात विक्रीची शक्यता आहे.

या सर्व प्रक्रियेत सुमारे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे. वरिष्ठांच्या आदेशाने घोटाळा केल्याचे लेखी पत्र काही कर्मचाऱ्यांनी दिले आहे. एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे थातूरमातूर कारवाई करून यातील बड्या महाभागांना वाचविण्याचा प्रकार मनपात शिजतो आहे. त्यामुळे जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईसह गुन्हा दाखल करावा. यातील लसीकरण केंद्रावरील नियुक्ती कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यास सत्य उजेडात येऊ शकेल, असे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, महानगरप्रमुख मनोज मोरे, संजय वाल्हे, राजेंद्र ढवळे, अजित बागूल आदींनी म्हटले आहे.

मालेगाव कनेक्शनची चौकशी करा

मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागानेही धुळे मनपा आरोग्य विभागाला पत्र दिले आहे. त्यात मालेगावचे नागरिक धुळे येथून बनावट लसीकरण प्रमाणपत्र घेत असल्याचे म्हटले आहे. यात पहिला व दुसऱ्या डोससाठी एकच बॅच नं ४१२१MC०९५ हा वापरण्यात आला आहे. याबाबत चौकशीतून कारवाई झाली पाहिजे. हा संघटित गुन्हेगारी व देशद्रोहाचा प्रकार आहे, असेही शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com