Bunty Tidme Politics: महापालिका आयुक्त मनीषा खत्री ५५ कोटीच्या चौकशीबाबत उदासीन? संशयाची सुई कोणाकडे...

Shivsena Eknath Shinde; Bunty Bunty Tidme will disturb the sleep of Municipal Commissioner Manisha Khatri-शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते महानगरप्रमुख बंटी तिदमे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केली विचारणा.
Bunty Tidme & Manisha Khatri
Bunty Tidme & Manisha KhatriSarkarnama
Published on
Updated on

Bunty Tidme News: महापालिकेचे माजी आयुक्त अशोक करंजकर ५५ कोटीच्या भूसंपादन घोटाळ्यामुळे चर्चेत आले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मागणी केली. मात्र सध्या हे प्रकरण मागे पडल्याचे चित्र आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे यांनी याबाबत महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. महापालिका प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. नागरिकांत देखील चर्चेचा विषय ठरलेला हा विषय तिदमे यांनी पुन्हा एकदा जोरकसपणे पुढे नेला आहे.

Bunty Tidme & Manisha Khatri
Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री कोकाटेंचा शिंदेंना चिमटा, ज्यांनी निवडून दिले ते शत्रू आहेत का?

या संदर्भात राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत फारशा हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे माजी आयुक्त अशोक करंजकर यांना ५५ कोटींच्या वादग्रस्त व्यवहारात अप्रत्यक्षरीत्या सहकार्य तर केले जात नाही ना, अशी स्थिती आहे.

Bunty Tidme & Manisha Khatri
Rajabhau Waje Politics: ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे चालविणार शिंदेच्या हेमंत गोडसे यांची ‘ ती ’ परंपरा!

नाशिक महापालिकेत गेल्या वीस वर्षापासून भूसंपादनाची ३५० प्रकरणे प्रलंबित आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनी महापालिकेने ताब्यात घेतल्या. मात्र अद्याप त्यांना मोबदला दिलेलं नाही. असे असताना बांधकाम व्यवसायिकांशी संबंधित ११ प्रकरणे आयुक्त करंजकर आणि नगररचना विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी परस्पर मंजूर केले.

यामध्ये संबंधितांना ५५ कोटी रुपये अदा करण्यात आले. हे करताना नियम आणि प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी असलेली अतिरिक्त आयुक्तांच्या समितीचे शिफारस घेण्यात आली नाही. याबरोबरच अनेक संशयास्पद कृती घडल्या आहेत.

याबाबत गहजब झाल्यावर आणि तक्रारी केल्यावर तत्कालीन आयुक्त करंजकर रजेवर निघून गेले होते. त्यांच्यावर कारवाईसाठी सगळीकडून दबाव निर्माण झाला असतानाच सध्याच्या आयुक्त मनिषा खत्री यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र शासनाने आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासन चौकशीबाबत ढिम्मच आहे.

शिवसेना शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख तिदमे यांनी हा विषय आता जोरकसपणे मांडला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे झोप उडण्याची शक्यता आहे. या संदर्भात तिदमे यांनी महापालिका प्रशासनाला विविध प्रश्न विचारले आहेत.

समस्यास्पद भूसंपादन प्रक्रियेची सविस्तर चौकशी होऊन नाशिककर यांच्या कोट्यावधी रुपयांची उधळण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावे आर्थिक नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे, या प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त खत्री यांचीही झोप उडण्याची शक्यता आहे .

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com