Eknath Shinde Politics: सुधाकर बडगुजर यांचा मार्ग आणखी खडतर... शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांनाही बडगुजर नकोच!

Sudhakar Badgujar Faces Resistance Within Shinde Sena: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाल्याने सुधाकर बडगुजर यांच्या राजकीय अडचणी वाढल्या.
Bunty Tidme & Sudhakar Badgujar
Bunty Tidme & Sudhakar BadgujarSarkarnama
Published on
Updated on

Shinde Sena Leaders Oppose Sudhakar Badgujar: शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही त्यांनी सलगी वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचा नवा घरोबा कोणता? या मार्गात अडथळे कमी होण्याची चिन्हे नाहीत.

शिवसेनेचे उपनेते बडगुजर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वेगळा विचार करीत होते. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षांकडे चाचपणी केली होती. पोलिसात दाखल विविध खटल्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्यांची राजकीय चाचपणी सुरू होती. भाजपच्या नेत्यांनी याबाबत त्यांच्यावर थेट आरोप केला आहे.

मात्र श्री. बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या मार्गात विविध राजकीय अडथळे उभे राहिले आहेत. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला प्रखर विरोध केला होता. त्याच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील बडगुजर हे गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी भाजप प्रवेश करीत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे शहरात सध्या भाजप विरुद्ध बडगुजर असा राजकीय वाद सुरू झाला आहे.

Bunty Tidme & Sudhakar Badgujar
Simhastha Kumbh Mela 2027: ठाकरे समर्थक आणि फडणवीस यांच्यात संघर्षाची ठिणगी, खासदार वाजे यांना बैठकीसाठी टाळले!

या वादात बुधवारी आणखी एका नेत्याची भर पडली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनीही विरोधाचा झेंडा बुलंद केला आहे. माजी नगरसेवक तिदमे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकच काढले आहे. त्यामुळे या वादात नवी भर पडली आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्या समवेत पार्टीत नृत्य केल्याचा आरोप बडगुजर यांच्यावर आहे. अशा देशद्रोही आरोपीं समवेत संबंध असलेल्या नेत्याला शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, अशी कणखर भूमिका बंटी तिदमे यांनी मांडली आहे. एवढेच नव्हे तर, त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी देखील बडगुजर यांना पक्षात घेतले नसते, असा दावा तिदमे यांनी केला.

सिडको परिसरातील स्थानिक राजकारणात बडगुजर हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते होते. महापालिकेतील ठाकरे पक्षाची सूत्रे देखील त्यांच्याकडेच होती. या राजकारणाचा भाग म्हणूनच भाजपचे स्थानिक नेते आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांचेही बडगुजर यांच्याशी विळ्या भोपळ्याचे नाते होते. हा सर्व राजकीय वाचपा काढण्याची बडगुजर विरोधकांना यानिमित्ताने संधी चालून आली आहे. त्याचा लाभ त्यांनी घेतला. त्यात बडगुजर यांची मात्र चांगलीच राजकीय कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com