संजय राऊत म्हणाले, एकदा छगन भुजबळांचाही पाहुणचार करा!

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा खासदार राऊत यांच्या उपस्थितीत झाला.
Shivsena leader Sanjay Raut & NCP leader Chhagan Bhujbal.
Shivsena leader Sanjay Raut & NCP leader Chhagan Bhujbal.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : आमदार सुहास कांदे चांगला पाहुणचार करतात. एकदा पालकमंत्री छगन भुजबळांना बोलवा. त्यांचाही पाहुणचार करा, असे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

Shivsena leader Sanjay Raut & NCP leader Chhagan Bhujbal.
शववाहिकेच्या प्रतिक्षेत आदिवासी माय लेकराच्या मृतदेहाची १२ तास परवड!

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा खासदार राऊत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार कांदे यांच्यातील राजकीय वाद बहुचर्चीत आहेत. नुकतेच श्री. कांदे यांनी श्री. भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघाचा निधी पळवला असा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका देखल केली आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेना नेते राऊत यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. त्यात ते काय बोलतात, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

या मेळाव्यात खासदार राऊत आपल्या हलक्या फुलक्या शैलीत म्हणाले, आमदार कांदे हे चांगला पाहुणचार करतात. एकदा पालकमंत्री छगन भुजबळांनाही बोलवा. त्यांचाही पाहुणचार करा. आमदार कांदे यांच्या विकासामागची तळमळ समजून घ्यायला हवी.

शिवसेनेच्या पुढाकारातून महाआघाडीचे सरकार राज्यात आहे. हे सरकार नसते तर भुजबळ देखील मंत्री म्हणून दिसले नसते. ते महाआघाडीचे नेते आहेत. त्यांनी आमदार कांदे यांना समजून घ्यायला हवे. आता त्यांनी नांदगावचा नाद सोडावा. नांदगावमधून शिवसेनेचा भगवा खाली उतरू देणार नाही.

यावेळी आमदार कांदे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सुनिल बागूल, अल्ताफ खान आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com