
Sanjay Raut on Balasaheb Thorat : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विधानसभेत नसल्याची खंत जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली.
"पण, महाराष्ट्रात आता बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा येणार असून, थोरातांच्या मागे उभे राहा", असे आवाहन खासदार राऊत यांनी केले.
संगमनेरच्या डिग्रसच्या संत बुवाजी बाबा यांच्या आध्यात्मिक सोहळा यात्रेत खासदार (Sanjay Raut) राऊत सहभागी झाले होते. 'थोरात यांनी पाणी, शिक्षण, शेती आणि सहकारमुळे या भागाला राज्यात प्रथम क्रमांकाचे लढवले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अत्यंत चांगले काम करणाऱ्या बाळासाहेबांचा पराभव मान्यच होत नाही', असे खासदार राऊत यांनी म्हटले.
'करोना संकटात महाराष्ट्राला वाचवले. मात्र खोटे अन् गद्दारीमुळे राज्यातील सरकार पाडले गेले. महाराष्ट्रात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे (MVA) सरकार पुन्हा येणार असून, थोरात यांच्या पाठीशी उभे राहा', असे आवाहन खासदार थोरात यांनी केले.
काँग्रेस नेते थोरात यांनी, डिग्रसचे देवस्थान श्रद्धास्थान आहे. इथं बकऱ्यांची बळी देण्याची परंपरा होती. परंतु ही प्रथा संत नारायण गिरी महाराज यांचा सप्ताह या ठिकाणी झाला आणि ही प्रथा बंद झाली. शिक्षणमंत्री असताना इथं शाळा सुरू केली. त्या माध्यमातून विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन काम करत आहेत. निळवंडे धरण आणि कालव्याचे काम पूर्ण केल्याचा दावा देखील केला.
'केंद्रात आणि राज्यात मत चोरी करून सरकार सत्तेवर आले. लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याकरता विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. आगामी काळामध्ये जातीयवादी पक्षांना थारा न देता, सर्वांनी महाराष्ट्राच्या हिताकरिता मानवता धर्म जोपासत महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे', असे आवाहन थोरातांनी केले.
रणजीतसिंह देशमुख, महंत बुवाजीबाबा पुणेकर, उमाजीबाबा पुणेकर, बबन सांगळे, डाॅ. जयश्री सांगळे, शिवसेनेचे अमर कतारी, शंकर खेमनर, पप्पू कानकाटे, संजय फड आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.