Shivsena Nashik convention : 'ते' रावण आणि 'हा' राम... संजय राऊत कुणाला म्हणाले?

Sanjay Raut targeted Narendra Modi : शिवसेनेच्या नाशिकच्या महाअधिवेशनात संजय राऊत कडाडले...
Narendra Modi, Sanjay Raut, Uddhav Thackeray
Narendra Modi, Sanjay Raut, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News :

नाशिकला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच संजय राऊत यांनी भाजप, नरेंद्र मोदींवर टीकेचा सिक्सर मारला आहे.

रावण अजिंक्य नाही. त्याला आम्ही निश्चित हरवू. कोण नरेंद्र मोदी? एकनाथ शिंदे आणि अजित पवार सगळ्यांना पाहून घेऊ. शिवसेना लढून पुन्हा एकदा या सगळ्यांचा पराभव करेल. आकाशाला गवसणी घालणारा भगवा फडकवेल, या शब्दांत आज शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला.

नाशिकमध्ये शिवसेनेचे (ShivSena) महाअधिवेशन सुरू झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांसह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते अधिवेशनाला उपस्थित आहेत. शिवाय राज्यभरातून शेकडो प्रतिनिधी उपस्थित आहेत. राऊत यांच्या भाषणाने प्रतिनिधींमध्ये जोष निर्माण झाला आहे.

Narendra Modi, Sanjay Raut, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray in Nashik: नाशिकच्या अधिवेशनातून ठाकरेंची शिवसेना कात टाकणार...

संजय राऊत यांच्या भाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. राऊतांनी अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून भाषणाला सुरुवात करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट रावणाशी तुलना केली.

संपूर्ण देशातील वातावरण राममय झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी या अधिवेशनाची ज्योत पेटवली आहे. आम्हीदेखील आमच्या अधिवेशनाची सुरुवात श्रीरामाचा जयघोष करूनच करत आहोत. रामाशी आमचे अतिशय जुने भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. शिवसेना नसती, शिवसेनेचे वाघ नसते तर कालचा अयोध्येतील सोहळा होऊ शकला नसता, असा दावा राऊतांनी केला.

आमचा राम काळाराम आहे, बाळासाहेब ठाकरे आहेत. अयोध्येचा रामदेखील आमचा राम आहे आणि आमच्याकडे शौर्य संयम आणि पराक्रम असलेला राम म्हणजेच उद्धव ठाकरे आहेत, असं वक्तव्य करून त्यांनी उद्धव ठाकरेंची रामाशी तुलना केली.

श्रीरामाला वनवास झाला तेव्हा एकच रावण होता. आज अनेक रावण आहेत. दिल्लीत, महाराष्ट्रात मुंबईला आणि नाशिकलाही रावण आहेत. पण रावण तेव्हाही अजिंक्य नव्हता आणि आजही अजिंक्य नाही. त्या रावणाला बालीने हरवले होते. हनुमानाने त्याचा कॉन्फिडन्स त्याच्याच दरबारात जाऊन संपवला होता, या शब्दांत राऊतांनी घणाघात केला.

मी एक रामभक्त आहे आणि इथे हजारो हनुमान शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. आजच्या रावणाचा पराभव करायला उद्धव साहेबांच्या आदेशाचीदेखील गरज नाही. हे हनुमान त्या रावणाचा पराभव करतील. कोण नरेंद्र मोदी, कोण मिंधे आणि कोण अजित पवार, शिवसेना या सगळ्यांचा दारुण पराभव करेल, असा विश्वास या अधिवेशनातून आपल्या सगळ्यांना देण्यासाठी उद्धव ठाकरे येथे आल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. राऊत यांच्या या वक्तव्याला आदित्य ठाकरेंनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

श्रीरामांमध्ये नेतृत्वगुण होते. त्याने राज्याच्या नव्हे, तर सामान्यांच्या मदतीने रावणाचा पराभव केला. आपल्यालादेखील कुठल्या अंबानी आणि अदानींच्या मदतीने नव्हे, तर या शिवसैनिकांच्या मदतीने आजच्या रावणाचा पराभव करायचा आहे, असे आवाहन राऊतांनी केले.

यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल केला. 'मिंधेच्या कारस्थानाने आमचे भाग्य बदलणार नाही. आम्ही लढून आमचे राज्य परत मिळवू आणि जिंकू आणि पुन्हा एकदा गगनाला गवसणी घालणारा भगवा फडकवू,' असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

(Edited by Avinash Chandane)

R...

Narendra Modi, Sanjay Raut, Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray Birthday : बाळासाहेबांनी नाशिकवर प्रेम केले अन् या गोदानगरीनेही शिवसेनेला भरभरून दिले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com