छगन भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेने दिली नंबर एक होण्याची घोषणा!

येवला येथे शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांच्या हस्ते सत्कार झाला.
Bhausaheb Choudhary, Shivsena
Bhausaheb Choudhary, ShivsenaSarkarnama

येवला : जिल्ह्यात (Nashik) नंबर एकचा पक्ष म्हणून शिवसेना (Shivsena) पुढे येत आहे. सहापैकी तीन नगरपंचायतीवर भगवा फडकला असून आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आहे तर महाविकास आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील मात्र ते जो आदेश देईल त्याचे आम्ही पालन करू असे प्रतिपादन संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी केले.

Bhausaheb Choudhary, Shivsena
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ओबीसींच्या बाजूने येईल!

येथील आसरा लॉन्स येथे नवनिर्वाचित शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार नरेंद्र दराडे होते. आमदार किशोर दराडे, मतदरसंघ संपर्कप्रमुख संभाजीराजे पवार, जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Bhausaheb Choudhary, Shivsena
पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हे; सर्वांना सामावून घ्या...

आगामी काळात सर्व प्रमुख संस्थांच्या निवडणुका असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेसाठी झोकून कामाला लागावे. आगामी सर्व निवडणुकीमध्ये पक्षाची संघटनात्मक मोट बांधून सर्व निवडणुकीसाठी ताकदीनिशी तयार राहावे. प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा उघडून पक्ष संघटना अधिक मजबूत करावी. गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम तालुक्यात राबवावा अशा सूचना श्री. चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

भगवा फडकणारच

निवडणुका स्वतंत्र लढवायच्या की महाविकास आघाडी करून लढवायच्या याचा निर्णय वरिष्ठ घेतील. आम्ही सर्व वरिष्ठांच्या निर्णयाचे पालन करू असे चौधरी यांनी सांगितले. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचून संघटन वाढवावे. गरजूंना मदतीचा हात द्यावा असे सांगून आगामी निवडणुकांत भगवा फडकणारच असा विश्वासही व्यक्त केला.

कोट्यवधींचा निधी

स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केल्याचे सांगून कोट्यवधीची कामे सुरू असून आणखी काही नवे कामे येत्या दिवसात सुरू होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून निधी मिळत असून सत्तेचा जनतेसाठी मोठा फायदा होत आहेत. सरकारची कामे कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे आमदार दराडे म्हणाले.

एकहाती सत्ता मिळवू

संपर्कप्रमुख संभाजीराजे पवार यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत करून या संस्थेवर शिवसेनेची एक हत्ती सत्ता मिळवू असे सांगत सर्वांनी जोमाने कामाला लागावे व संघटन वाढवावी आवाहन केले.

युवासेना विस्तारक कुणाल दराडे यांच्यातर्फे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, निवृत्ती जगताप, झुंजार देशमुख, प्रकाश पाटील, शिवा सुराशे, बाळासाहेब पिंपरकर, किशोर सोनवणे, वाल्मिकराव गोरे, छगन आहेर, बाळासाहेब जगताप उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com