Shivsena: शिवसेनेच्या महिलांनी शिंदे समर्थकांना थेट चोपलेच!

शहापूर येथे नाशिकच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अंगविक्षेप करणाऱ्या शिंदे समर्थकांना चोपले.
Angree Shivsena womens
Angree Shivsena womensSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : दसरा (Vijayadashami) मेळाव्यासाठी मुंबईला (Mumbai Rally) जाणाऱ्या शिवसेनेच्या (Shivsena) महिला कार्यकर्त्यांना शिंदे (Eknath Shinde Group) गटाच्या कार्यकर्त्यांनी अंगविक्षेप करीत चिडवले. त्यामुळे संतापलेल्या महिल्यांनी या कार्यकर्त्यांना गाडीतून खेचत शिवसेनेचा चांगलाच हिसका दाखवला. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः या महिलांपुढे लोळण घेतली. (Aggressive Shivsena womens on beaten Shinde Group workers)

Angree Shivsena womens
सरकारची १०० रुपयांची किट; पण सव्वादोन कोटी लोक धान्यापासून अद्यापही वंचित !

या घटनेचा व्हीडीओ चांगलाच व्हायरल झाल्याने त्याचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात देखील नेच्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. दसऱ्यानिमित्त काल शिवसेनेचा पांरापरीक मेळावा शिवाजी पार्क मैदानावर (शिवतीर्थ) होता.

Angree Shivsena womens
Dasara Melava : सुषमा अंधारेंनी गाजवली सभा, सोशल मिडीयावर भाषणाची जोरदार चर्चा!

तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी करीत राज्यात भाजपच्या मदतीना सत्ता स्थापन केली. त्यांनी देखील शिवसेनेला आव्हान देण्यासाठी बीकेसी मैदानावर मेळावा ठेवला होता. त्यामुळे शिवसेना समर्थकांच्या दृष्टीने हा प्रतिष्ठेचा मेळावा होता. त्यामुळे अनेक कार्यकर्ते उस्फूर्तपणे मुंबईला गेले होते. नाशिकच्या महिला एका खाजगी बसने मुंबईला जात असताना कसारा येथे नगर येथील शिंदे गटाचे समर्थक कार्यकर्ते जीपने मुंबईला जात होते. त्यांनी बसला ओव्हरटेक करताना बसमधील महिलांना अंगठ्याची खुण करीत अंगविक्षेप केले.

हे पाहिल्यावर संतापलेल्या महिल्यांनी बस चालकाला जीपला ओव्हरटेक करण्याची सुचना केली. बसने शहापुरजवळ या जीपला ओव्हरटेक करून थांबवले. यावेळी संतप्त महिला कार्यकर्त्यांनी अंगविक्षेप करणाऱ्यांना जाब विचारला. त्यांना गाडीतून खाली खेचत चोप देण्यास सुरवात केली. यावेळी घाबरलेले कार्यकर्ते माफी मागत होते. काहींनी तर या महिला कार्यकर्त्यांपुढे अक्षरशः लोळण घेतली.

यावेळी काही महिला कार्यकर्त्यांनी सामोपचाराची भूमिका घेत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना समज देऊन महिलांना आवरले. त्यानंतर महिला कार्यकर्त्या बसने मुंबईला रवाना झाला. दरम्यान मारहाण झालेले कार्यकर्ते नगरचे होते, असा दावा शिंदे गटाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे यांनी सांगितले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com