खडसेंना धक्का; भुसावळच्या नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र

नगरविकास विभागाने दिलेल्या निकालामुळे पक्षातरबंदी कायद्याचा फटका
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

भुसावळ : पक्षांतरबंदी कायद्याचे (Anti defection Act) उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळचे (Bhusawal) माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे (Raman Bhole) यांच्यासह नऊ नगरसेवकांना नगरविकास विभागाने (Maharashtra Government) सहा वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे. यामुळे भुसावळच्या राजकारणात खळबळ उडाली असून, एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाला मोठा धक्का मानला जात आहे. पुष्पाबाई बत्रा यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. (Urban devolopment department pass order on Appeal)

Eknath Khadse
Twitter War : मुरलीधर मोहोळांनी अजितदादांना विचारला जाब

महाराष्ट्र शासन नगरविकास मंत्रालयातर्फे या निकालाबाबत आदेश पारित करण्यात आला आहे. नगराध्यक्ष रमण भोळे, सदस्य सविता मकासरे, लक्ष्मी मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे यांना अपात्र घोषित केले आहे.

Eknath Khadse
महापालिका वॅार्डरचना आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम १९८६, १९८७ चा कलम ७ /३ अन्वये रमण देवीदास भोळे लोकनियुक्त नगराध्यक्ष व इतरांविरोधात हा निकाल असून, पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत निकाल आहे. त्याच्या पक्षांतराबाबत राजीनामा व नगर परिषद, पक्षास कुठल्याही अवगत केला नसल्याने हा निकाल देण्यात आला आहे. यात रमण भोळे व इतर नऊ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षांतर केल्याने १८ डिसेंबर २१ पासून ते सहा वर्षांच्या कालावधीकरिता अनर्ह ठरविण्यात आले आहेत.

याबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की मी बाहेरगावी होतो; परंतु आज तारीख होती एवढे मला माहिती आहे. यानंतर पुढे काय करणार, असे विचारले असता त्यांनी सर्वानुमते ठरवणार असल्याचे सांगितले.

यामुळे झाली बडतर्फी

२०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर रमण भोळे, तर नगरसेवकपदावर अनुक्रमे अमोल इंगळे (प्रभाग १ ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग १ अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग २ अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग ६ ब), मेघा देवेंद्र वाणी (१० अ), अॅड. बोधराज दगडू चौधरी (९ ब), शोभा अरुण नेमाडे (२० अ), किरण भागवत कोलते (२२ ब) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग १९ अ) हे निवडून आले होते. पण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी १७ डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यासाठी या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी केली होती.

या याचिकेवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यात तत्कालीन नगराध्यक्ष तथा खडसे समर्थकांसह दहा नगरसेवकांना जिल्हा दंडाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र ठरविले होते. या निकालाविरुद्ध नगरविकास विभागाकडे अपील करण्यात आले होते. मंगळवारी यावर सुनावणी होऊन नगरविकास विभागाकडून निकाल देण्यात आला. निकालपत्र नगरविकास विभागाचे अवर सचिव प्रीतमकुमार जावळे यांनी बत्रा यांना माहितीसाठी पाठविले आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com