Saibaba : साईबाबा समाधी मंदिरात श्रीलक्ष्मी पूजन उत्साहात; आंध्र प्रदेशच्या भक्ताची लाखोंची देणगी!

Saibaba Samadhi Temple : साईबाबा संस्‍थानच्या वतीने परंपरेनुसार दीपावलीनिमित्त श्रीलक्ष्‍मी पूजन उत्‍सव उत्साहात साजरा .
Saibaba Trust
Saibaba TrustSarkarnama

Shirdi News : शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिरात श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने परंपरेनुसार दीपावलीनिमित्त श्रीलक्ष्‍मी पूजन उत्‍सव उत्साहात साजरा करण्‍यात आला. संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांच्‍या पत्‍नी ज्‍योती हुलवळे यांच्‍या हस्‍ते लक्ष्‍मी-कुबेर पूजन करण्‍यात आले.

Saibaba Trust
Balasaheb Thorat On BJP: भाजपची अस्वस्थता आणखी वाढणार ? बाळासाहेब थोरातांनी केला मोठा दावा

दरवर्षीप्रमाणे यावर्षी रुढी परंपरेनुसार दीपावली श्रीलक्ष्‍मी पूजन उत्‍सव साजरा करण्‍यात आला. दीपावलीनिमित्त आज सायंकाळी सहा वाजता समाधी मंदिराच्‍या गाभा-यात संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांच्‍या पत्‍नी ज्‍योती हुलवळे यांच्‍या हस्‍ते लक्ष्‍मी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी श्रीगणेश पूजन, लक्ष्‍मी-कुबेर पूजन, सरस्‍वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम झाले.

या वेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, मा‍लती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, लेखाधिकारी कैलास खराडे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. लक्ष्मी-कुबेर पूजन झाल्‍यानंतर सायंकाळी सहा वाजता श्रींची धुपारती झाली. धुपारतीनंतर साईभक्‍तांसाठी दर्शनरांग सुरू करण्‍यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दीपावली उत्‍सवानिमित्‍त भुवनेश्‍वर येथील साईभक्‍त श्री सदाशिव दास श्री साईकृपा चॅरिटेबल ट्रस्‍ट यांच्‍या वतीने देणगी स्‍वरूपात विद्युत रोषणाई व आंध्र प्रदेश येथील देणगीदार साईभक्‍त श्रीमती पी. श्रीशक्‍ती यांच्‍या देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदिरात व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली. तसेच आंध्र प्रदेश येथील देणगीदार साईभक्‍त एम. श्रीनिवास राव यांनी मेडिकल फंडासाठी 12 लाख रुपये देणगीचा डी. डी. संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्‍याकडे सुपूर्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com