Dimbhe Manikdoh Tunnel : विखेंना आनंदी... आनंद..; कुकडीसाठी मोठा निर्णय, डिंबे–माणिकडोह 16 किमी बोगद्याला मंजुरी, 5704 कोटींच्या खर्चालाही हिरवा कंदील

Maharashtra Cabinet clears the 16-km Dimbhe-Manikdoh tunnel and ₹5,704.50 crore revised Kukadi irrigation project cost : डिंबे धरणातील अतिरिक्त पाणी माणिकडोहकडे वळविण्याचा मार्ग मोकळा; 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमतेला चालना, अहिल्यानगरसह पुणे-सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिलासा
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cabinet Decision : श्रीगोंद्यातील कुकडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डिंबे ते माणिकडोह धरणांना जोडणाऱ्या सुमारे 16 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

तसेच पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील या निर्णयामुळे यासाठी पाठपुरावा करणारे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांना आनंदी आनंद झाला आहे. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या निर्णयामुळे कुकडी प्रकल्पातून 144912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण अहिल्यानगरचा दुष्काळी पट्टा दुष्काळमुक्त होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिंबे–माणिकडोह बोगद्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने कुकडीच्या डाव्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न अधिक भक्कम होणार आहे.

Sujay Vikhe
Pune Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेवर सरकारला सत्यजीत तांबेंचा इशारा; ‘25 दिवस झाले, समितीला माहितीच नाही’

सुजय विखे पाटील म्हणाले, साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता डिंबे–माणिकडोह बोगद्याचा निर्णय झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आपणच मार्गी लावला. शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले. आज राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे ते आश्वासन प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.

Sujay Vikhe
Nilesh Lanke hunger strike : अहिल्यानगरमध्ये 2657 शिक्षक पदे रिक्त; 50 हजार विद्यार्थ्यांसाठी खासदार लंके यांचे बेमुदत उपोषण

तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार

माणिकडोह धरणाची क्षमता सुमारे 10.5 टीएमसी आहे. मात्र, स्थानिक पावसाच्या पाण्यावर हे धरण अपेक्षित प्रमाणात भरत नाही. दुसरीकडे, डिंबे धरण आणि त्याखालील घोड धरण भरल्यानंतर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी खालच्या भागाकडे वाहून जाते. या पार्श्वभूमीवर डिंबे धरणातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी सुमारे 16 किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात वळविण्याची संकल्पना आहे. कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरूच राहणार : विखे पाटील

दक्षिण अहिल्यानगरला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ओव्हरब्रिज, साकळाई योजनेनंतर आता डिंबे–माणिकडोह बोगद्याचा निर्णय झाला आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चालाही मोठी मान्यता मिळाल्याने सिंचनाचा प्रश्न अधिक व्यापक पद्धतीने मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील पाठपुरावाही केला जाईल, असे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com