Bunty Jahagirdar murder : राजकीय वर्चस्वातून बंटी जहागीरदारला 'टिपला'; गोळ्या झाडताना दोघा आरोपींकडून 'एकच भाई...', असा उल्लेख!

Shrirampur Bunty Jahagirdar Murder Political Rivalry Angle Two Arrested : श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार याच्या हत्येमागे राजकीय वर्चस्वाचा वाद असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
Bunty Jahagirdar murder
Bunty Jahagirdar murderSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur crime news : पुण्यातील जंगली महाराज साखळी बाॅम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदार याच्या हत्येसंदर्भात पोलिसांनी कृष्णा अरुण शिनगारे (वय 23) आणि रवींद्र गौतम निकाळजे (वय 23) या दोघा हल्लेखोरांना अटक केली आहे.

बंटी जहागीरदार याचे चुलत बंधू नगरसेवक रईस अब्दुलगनी शेख यांच्या फिर्यादीनुसार हत्येमागे राजकीय वर्चस्ववादाचे कारण असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास सुरू केला आहे.

फिर्यादीनुसार, चन्या बेग, सोन्या बेग आणि टिप्या बेग या तिघांनी कट रचल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदाराचे काम केल्यामुळे त्यांचा विजय झाला. तसेच नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षांचे काम केल्याने त्यांचा विजय झाला. श्रीरामपूरमध्ये (Shrirampur) संघटित गुन्हेगारी करणारी टोळी चालवणाऱ्या या तिघा भावांना, बंटी जहागीरदार याच्या या राजकीय वर्चस्वाची अडचण अन् अडथळा येत होता.

विधानसभा निवडणूक (Municipal Election) एक भाऊ कमी फरकाच्या मतदाने हारल्याचा राग मनात धरत आणि नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षांसाठी केलेल्या कामाचा राग धरून बंटी जहागीरदार याची हत्या करण्यात आली. या हत्येपूर्वी एकाने जाहीर भाषणातून चिथावणीखोर धमक्याही बंटी याला दिल्या होत्या.

Bunty Jahagirdar murder
Top 10 News: भाजपला निष्ठावंतांचा असाही दणका ते बजरंग बाप्पांना हेलिकॉप्टरमधून लिफ्ट

कृष्णा शिनगारे आणि रवींद्र निकाळजे या दोघांनी बंटी जहागीरदारवर गोळ्या झाडताना, हल्ला करताना, इथं 'एकच भाई', असे म्हणत हल्ला केला. बंटी जहागीरदार याच्यावरील हल्लेखोरांना संगमनेरजवळून ताब्यात घेण्यात आलं.

Bunty Jahagirdar murder
Shiv Sena AB form rejected : वर्ष सरताच शिंदेंच्या शिवसेनेला दणका! एबी फाॅर्म भरताना उमेदवारांचा प्रताप, झेराॅक्स, खाडाखोड, व्हाईटनर अन् सह्यांची चूक...

तणाव कायम

​हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य सूत्रधारांच्या अटकेच्या मागणीसाठी गुरूवारी श्रीरामपुरात तणाव पाहायला मिळाला. दुपारी बंटी जहागीरदार याच्या मृतदेह मौलाना आझाद चौकात आल्यानंतर नातेवाईक आणि संतप्त समर्थकांनी रस्ता रोखून धरला. मुख्य आरोपी अटक होईपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर व निरीक्षक नितीन देशमुख यांना निवेदन देण्यात आले. पोलिसांनी दिलेले आश्वासन तसेच "दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासात सहकार्य करावे," असे आवाहन मौलानांनी केले.

कटात पडद्यामागे कोण कोण?

​पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी, आरोपींनी गुन्ह्याची माहिती दिली असून, त्यांना शस्त्रे कोणी पुरवली आणि या कटात पडद्यामागून कोणाचे पाठबळ होते, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. श्रीरामपूरमध्ये 'एसआरपीएफ'च्या दोन कंपन्यांसह पोलिसांचे कडेकोट बंदोबस्त आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com