Congress : शुभांगी पाटील आशीर्वाद घेण्यासाठी थोरातांच्या घरी; आशीर्वाद सोडा घरात प्रवेशही मिळाला नाही

Shubhangi Patil : शुभांगी पाटील यांना बाळासाहेब थोरातांच्या घरी प्रवेश का नाकारण्यात आला?
Shubhangi Patil
Shubhangi PatilSarkarnama

Shubhangi Patil : नाशिक पदवीधर मतदारसंघात दिवसेंदिवस अधिक रंगतदार घडामोडी समोर येत आहेत. आता महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील आज (ता. 20 जानेवारी) संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्यांना थोरातांच्या घरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.

थोरात कुटुंबीय मुंबईत असल्याने शुभांगी पाटील यांना संगमनेर येथील थोरातांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारातूनच परत जावे लागले आहे. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना घरी कोणीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे शुभांगी पाटील आल्या पावली परत गेल्या.

Shubhangi Patil
Satyajeet Tambe News: निलंबनावर सत्यजीत तांबेंनी मौन सोडलं; म्हणाले, निलंबित केल्याचे दु:ख, पण..

नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबेंना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने त्यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांच्यावरही पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.

त्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. एकीकडे याच मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे एकीकडे भाचा आणि दुसरीकडे पक्ष अशी कोंडी बाळासाहेब थोरात यांची झाली आहे.

Shubhangi Patil
Kasba Constituency : कसब्यात भाजपाचा उमेदवार ठरल्यानंतरच कॉंग्रेसचे ठरणार; निवडणूक लढण्यासाठी शिवसेना आग्रही

शुभांगी पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला असून त्या आज संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. शुभांगी पाटील या आपल्या काही कार्यकर्त्यांसह थोरात यांच्या निवासस्थानी आल्या.

पण यावेळी त्यांना वॉचमनने गेटवरच अडवलं. थोरात कुटुंबीय हे मुंबईत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर पाटील यांनी कुणाला तरी फोन केला. पण तरीही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शुभांगी पाटील आल्या पावली परत गेल्या.

Shubhangi Patil
Solapur Politics : राजकारण तापलं! तांबेवरील कारवाईनंतर पदाधिकाऱ्याचा राजीनामा

दरम्यान, शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या संगमनेर (Sangamner) तालुक्यात आल्या असता त्यांचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात देखील बैठक पार पडली. पण या बैठकीला काँग्रेसचे कार्यकर्ते अनुपस्थित होते. तर थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्याविरोधात शुभांगी पाटील या मदत मागण्यासाठी आल्या होत्या. पण त्यांना थोरातांच्या घरात प्रवेश नाकारण्यात आल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com