Girish Mahajan: फडवीसांसमोरच गिरीश महाजनांचा अजब दावा; दहा-पंधरा हजार लोक नाशिक सोडून पळाले, कारण ...

Girish Mahajan Claims 10,000–15,000 Left Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी अजब दावा केला आहे; दहा ते पंधरा हजार लोक नाशिक सोडून पळाले, असे विधान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: नाशिक शहर गुन्हेगारीने त्रस्त आहे. अनेक गुंड आणि वादग्रस्त नेत्यांना सत्ताधारी पक्षाचा आश्रय असतानाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे गुरुवारी भूमिपूजन झाले. यावेळी गिरीश महाजन यांनी एक वेगळाच दावा केला. त्यांचा हा दावा सध्या नाशिककरांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

नाशिक शहराला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी खास आदेश दिल्याचे महाजन यांनी सांगितले. याबाबत धडाकेबाज काम सुरू झाले आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गुन्हेगारी मोडून काढल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांच्या या कारवाईचा धसका गुन्हेगारांनी चांगलाच घेतला आहे. याबाबत आपण समाधानी आहात की नाही? असा प्रश्न त्यांनी सभेला उपस्थित नागरिकांना केला.

महाजन म्हणाले, "गुन्हेगारांविरुद्ध विरुद्ध पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. त्यामुळे दहा ते पंधरा हजार लोक नाशिक सोडून पळाले. आता नाशिक शहर सुरक्षित झाले आहे. हे सर्व गुन्हेगार नाशिक सोडून श्याम खाटू या देवस्थानात गेले आहेत. विविध देवस्थानांना हे लोकशरण गेले आहेत. आम्हाला वाचवा असा देवाचा धावा करत आहेत. त्यामुळे आम्हाला कुंभमेळा सुरक्षित करण्यासाठी त्याची मदत होईल,"

अगदी अलीकडे देखील अनेक वादग्रस्त आणि गुन्हे असलेल्या नेत्यांचा भाजप प्रवेश झाला. प्रवेशाला स्थानिक आमदारांसह झाडून सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता. वादग्रस्त आणि गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांचा हा वाद थेट प्रदेश अध्यक्षांपर्यंत पोहोचला होता. मात्र या नेत्यांच्या प्रवेशाचा अट्टाहास महाजन यांनी केला.

Girish Mahajan
Nagpur Municipal Election 2025: नव्या आघाड्यामुळे राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी वाढणार

त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनाच फैलावर घेतले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत माध्यमांकडे तोंड उघडू नये, असा दम त्यांना भरला होता, अशी चर्चा आहे.

आता मात्र नाशिक शहरातील गुन्हेगार आणि राजकीय आश्रय असलेले नेतेच शहर सोडून पळून गेल्याचे नवे विधान पुढे आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील राजकारण आणि त्याचे गुन्हेगारीकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दहा ते पंधरा हजार एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हेगार शहरात वावरत होते का? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com