Tehsildar: जमिनीच्या अनुकूल निकालाच्या बदल्यात 10 लाखांची मागणी! नायब तहसीलदारांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Sinnar Naib Tehsildar: भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांनी जनतेला कामाच्या बदल्यात मोबदल्यासाठी वेठीला धरण्याच्या अनेक घटना आपण आसपास पाहत असतो.
Naib Tehsildar Sanjay Dhangar
Naib Tehsildar Sanjay Dhangar
Published on
Updated on

Sinnar Naib Tehsildar: भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांनी जनतेला कामाच्या बदल्यात मोबदल्यासाठी वेठीला धरण्याच्या अनेक घटना आपण आसपास पाहत असतो. अनेकदा अशा अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये पडलेल्या छाप्यांमध्ये मोठं घबाड मिळाल्याच्या घटना देखील उघडकीस येतात. पण सरकारी बाबूंची खाबूगिरी मात्र संपवण्याचं नाव घेत नाही. असाच खाबुगिरीचा प्रकार नाशिकमध्ये घडला असून जमिनीचा निकाल बाजूनं लावून देण्याच्या बदल्यात जिल्ह्यातल्या नायब तहसिलदारांना लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ पकडल्यानं मोठी कारवाई करण्यात आली आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Naib Tehsildar Sanjay Dhangar
Jayant Patil On Eknath Shinde : 'असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं!', जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंसमोरच आगीत ओतलं तेल

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीनं केलेल्या या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. अडीच लाख रुपयांची लाच घेताना सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं आहे. या अधिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यात धनगर अडकले त्यामुळं त्यांच्यावर आता मोठी कारवाई केली जाणार आहे. जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात त्यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती. याच व्यक्तीनं पुढे लाचलुचपत विभागाकडं तक्रार दिली.

Naib Tehsildar Sanjay Dhangar
Akole Sangamner railway demand : शिंदेंच्या शिलेदारानं फलक झळकवताच, अजितदादांच्या लडक्या आमदाराची मागणीचा "फ्लेक्स" घालून विधिमंडळात एन्ट्री!

दरम्यान, एसीबीकडं तक्रार आल्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांनी ट्रॅप लावला. यावेळी तक्रारदारानं नायब तहसीलदारांना पैशांबाबत तडजोड करण्यास सांगितलं. त्यानुसार तक्रारदारानं तहसीलदारांकडं तशी विनंती केल्यानंतर तडजोडीत अडीच लाखांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीनं धनगर यांना रंगेहाथ पकडले. सोपान हॉस्पिटलसमोर लाच स्वीकारताना नायब तहसीलदार संजय धनगर यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com