Nashik City BJP News: भाजपच्या शहराध्यक्षपदी नवीन चेहरा बसविण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यासाठी पक्षाच्या सरचिटणीस व निरीक्षक माधवी नाईक यांची मंगळवारी आमदारांसह काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. या पदासाठी साठहून अधिकांनी इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केल्याने निरीक्षकही संभ्रमीत झाल्या. (NMC contractors also lobbing for there loyal workers shall be in the race)
नाशिक (Nashik) शहर भाजप (BJP) अध्यक्षपदासाठी गेली काही वर्षे सातत्याने चर्चा सुरु आहे. शहराध्यक्ष गिरीष पालवे (Girish Palve) यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार हा कळीचा मुद्दा आहे. यासंदर्भात निरीक्षकांनी इच्छुकांकडे चाचपणी केली. साठ जणांनी या स्पर्धेत असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे काही माजी नगरसेवकांना प्रोजेक्ट करण्यासाठी ठेकेदारदेखील मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. ठेकेदारांच्या या हस्तक्षेपामुळे भाजपमध्ये नाराजीचा स्फोट होणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून वेगाने पावले उचलण्यात आली आहे. यापूर्वी नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहराध्यक्ष बदलणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. परंतु, पक्षाच्या सरचिटणीस व निरीक्षक माधवी नाईक यांनी मंगळवारी पक्षाचे आमदार व काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी शहराध्यक्ष बदला संदर्भात चर्चा केल्याने शहराध्यक्ष बदलणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ठेकेदारांचे लॉबिंग जोरात
शहराध्यक्ष पदावर आमदारांची नियुक्ती केली जाणार नाही, असे यापूर्वीच प्रदेश पातळीवरून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता माजी नगरसेवकांनी शहराध्यक्ष पदासाठी कंबर कसली आहे. स्थायी समितीचे माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, गणेश गिते, संभाजी मोरुस्कर, जगदीश पाटील, अरुण पवार, उत्तम उगले, प्रशांत जाधव, अनिल भालेराव, अजिंक्य साने यांची नावे चर्चेत आहे.
केंद्रारात, ज्यात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. सत्ता असल्यामुळे या पक्षाकडे गर्दी आहे. त्यात हौसे, नवसे सर्वच प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे प्रस्थापित नेते सावध आहेत. आगामी महापालिका, जिल्विहा परिषद-पंचयात समिती, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांमुळे या पदावर हक्काचा माणुस असणे सोयीचे असते. हा विचार करूनच चढाओढ लागली आहे.
सत्ता असताना पक्ष संघटनेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखपदांवर आपल्या हक्काचा माणूस बसण्यासाठी ठेकेदारांचे लॉबिंग होत असल्याचे सर्वश्रुत आहे.भाजपच्या शहराध्यक्ष पदावर ठराविक व्यक्तींना विराजमान करण्यासाठीदेखील काही ठेकेदार कार्यरत झाले आहे. गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असताना त्यावेळेसदेखील हे ठेकेदार मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाले होते. पक्ष आपणच चालवत असल्याचे वातावरण त्यावेळी निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. आतादेखील महापालिका व राज्यात सत्तेत आल्यास आपल्याच हाती सूत्रे राहतील, अशी तजवीज करण्यासाठी शहराध्यक्षपदावर मर्जीतील व्यक्ती बसविण्यासाठी ठेकेदार कार्यरत झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.