भाजपच्या माजी आमदाराचा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या

माजी आमदार स्मिता वाघ (Smita Wagh) यांचाही एका गटातील अर्ज बाद करण्यात आल्यानं राष्ट्रवादीचे (NCP) निवडणुकीतील पारडे जड झाले आहे.
Smita Wagh
Smita Waghsarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा बँक (Jalgaon District Bank Election) संचालक निवडणुकीत आता वाद सुरू झाला आहे, अर्ज बाद केल्याच्या निषेधार्थ भाजप माजी आमदार स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्यासह तिघांनी निवडणूक अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीत आज भाजपच्या खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ, भारती चौधरी, यांचा अर्ज बाद झाला यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा अमळनेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून अर्ज बाद केला आहे, आपला अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केल्याच्या आरोपावरून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे, तर भाजपच्या भारती आत्तरदे यांचा अर्ज बाद केला आहे. त्यांनीही आंदोलन सुरू आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तसेच माजी आमदार स्मिता वाघ (Smita Wagh) यांचाही एका गटातील अर्ज बाद करण्यात आल्यानं राष्ट्रवादीचे (NCP) निवडणुकीतील पारडे जड झाले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादीलाही धक्का बसला आहे.

Smita Wagh
'या' निर्णयामुळे पोलिसांची ताकद, क्षमता वाढणार : वळसे पाटील

भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी महिला राखीव व इतर मागासर्वग या दोन गटात अर्ज दाखल केला होता. पण दोन्ही अर्ज छाननीत बाद झाले आहेत. एका अर्जावर त्यांची सहीच नसल्याचे समोर आले आहे. रक्षा खडसे या पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यामुळे खडसे कुटुंबातच सामना रंगणार होता. पण रक्षा खडसे यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याने ही निवडणूक आता एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत ; OBCनिधीवरुन पडळकरांचा हल्लाबोल

मुंबई : : काँग्रेस नेते आणि मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवार हे ओबीसी (OBC) व भटके विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागिर समजून मनमानी कारभार करतायेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ व हसं या या प्रस्थापितांच्या सरकारनं करून ठेवलं आहे, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com