रावसाहेब दानवेंना लवकरच नांगर हाकायला पाठवू!

सोयगाव नगरपंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रीया
Raosaheb Danve & Abdul Sattar
Raosaheb Danve & Abdul Sattar Sarkarnama

औरंगाबादः सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना घवघवीत यश मिळालं. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र यात दानवेंना हार पत्करावी लागली.

या निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्प्रयात आली. त्यानंतर प्रतिक्रीया व्यक्त करताना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेंना लवकरच नांगर हाकण्यास पाठवू, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य भाजपच्या नेत्यांना चांगलेच जिव्हारी लागले असे चित्र आहे. याबाबत भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी अब्दुल सत्तारांची चांगलीच खरडपट्टी काढली.

Raosaheb Danve & Abdul Sattar
आदित्य ठाकरेंच्या धडाडीच्या निर्णयाने वाचला २०० वर्षे जुना वटवृक्ष!

काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सत्तार यांच्या टीकेला एका वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना उत्तर दिले. ते म्हणाले, अब्दुल स्ततार हे सत्तेच्या मागे धावणारे नेते आहेत. आगामी निवडणुकीत ते शिवसेनेबरोबर राहतीलच याची शक्यता नाही. ते आज जे बोलले ते दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षातही रहात नाही. ते विसरून जातात. रावसाहेब दानवे यांना शेतात वखरावर पाठवणारा कुणीही नेता लोकसभा मतदारसंघात नाही. त्यामुळे अब्दुल सत्तार काय बोलले हे आम्ही फार गांभिर्याने घेत नाही.

Raosaheb Danve & Abdul Sattar
आमचे स्वकीय, विरोधकांनी राजकीय नैतिकता गुंडाळून ठेवली?

सत्तारांनी भगवा फडकवला

औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव नगरपंचायतमधील एकूण १७ जागांपैकी ११ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालाने सोयगाव नगरपंचायतीवर भगवा फडकला आहे. भाजपला केवळ सहा जागा मिळाल्या. याबाबत सत्तार म्हणाले, रावसाहेब दानवे यांच्यासह दोन केंद्रीय राज्यमंत्री माझ्याविरोधात होते. मात्र त्यांना आम्ही भुईसपाट केले आहे.

श्री सत्तार यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव करीन. त्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, असे विधान केले होते. सोयगावमधील नगरपंचायतीच्या निकालानंतर डोक्यावरील टोपी निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com