Jayant Patil News : लाईट गेली तरी जयंत पाटील थांबले नाहीत; मोबाईल टॉर्चच्या उजेडात ठोकले भाषण!

Nashik News : जयंत पाटलांच्या सभेचा व्हिडिओ तुफान व्हायरल
Jayant Patil News
Jayant Patil News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून ते पक्षवाढीसाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

'राष्ट्रवादी पुन्हा...वारे परिवर्तनाचे...ध्यास प्रगतीचा' या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीच्या या दौर्‍याची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच जयंत पाटील हे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत.

विविध जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा ते या दौऱ्याच्या माध्यमातून घेत आहेत.

Jayant Patil News
Officers Transfer Orders : सनदी-पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आजच निघाले असते पण..

या पार्श्वभूमीवरच जयंत पाटलांनी मंगळवारी (दि.28 मार्च) रात्री अकरा वाजता नाशिकमधील चांदवड विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत त्यांना मार्गदर्शन केले. मात्र, ही बैठक सुरू असतानाच अचानक वीज गायब झाली.

वीज येईल याची वाट न बघताच जयंत पाटील यांनी मोबाईल टॉर्चच्या उजेडात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. लाईट गेली तरी जयंत पाटील मात्र थांबले नाहीत. मोबाईल टॉर्चच्या उजेडात त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्या या बैठकीची राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम 'राष्ट्रवादी पुन्हा.. वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा' या टॅगलाईनखाली राबवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com