`एसटी`च्या ५७ आंदोलकांचे निलंबन; त्यांनी मांडली रस्‍त्‍यावर चूल!

नाशिकला निलंबनाच्‍या कारवाईनंतरही एसटी (ST workers strike) आंदोलनाची तीव्रता कायम.
ST Andolan
ST AndolanSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्‍य स्‍तरावर सुरू असलेल्‍या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता जिल्‍ह्यात कायम आहे. आतापर्यंत ५७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असताना, कर्मचाऱ्यांनी बुधवारी आंदोलनात सहभाग कायम ठेवला. इगतपुरी आगार वगळता अन्‍य सर्व आगारांतील बससेवा ठप्प राहिली. दरम्‍यान, आंदोलनकर्त्यांनी आगारातच ठाण मांडत रस्‍त्‍यावर चूल पेटवली.

ST Andolan
पालकमंत्री भुजबळ- आमदार कांदे वादामुळे बैठक नाशिकला अन् निर्णय होणार मुंबईला!

एसटी महामंडळाच्‍या बहुतांश सर्वच आगारातील बससेवा सध्या ठप्प आहे. इगतपुरी वगळता अन्‍य सर्व आगारातून बस निघाली नाही. मंगळवारी मुंडन आंदोलन केल्‍यानंतर बुधवारी आंदोलनकर्त्यांनी प्रातिनिधिक स्‍वरूपात भिक मांगो आंदोलन केले. या अंतर्गत मित्र, नातेवाइकांकडून पैसे मागत शासनाच्‍या धोरणाचा निषेध नोंदविला, तर संघटनाचे काही पदाधिकारी सुनावणीसाठी मुंबईला रवाना झाले. एन. डी. पटेल मार्गावर आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले असून, बुधवारी थेट चूल पेटविली.

ST Andolan
`मनसे` म्हणते, साहित्य संमेलन गीतात स्वा. सावरकरांचा उल्लेख का नाही?

ट्रान्‍सपोर्ट असोसिएशनचा पाठिंबा

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आंदोलनाला पाठिंबा दिला. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी यासंदर्भात भूमिका जाहीर केली आहे. एसटी कर्मचारी कृती समितीस पाठिंबा पत्र दिले. अध्यक्ष राजेंद्र फड, सुभाष जांगडा, विशाल पाठक, दीपक ढिकले, सिद्धेश्वर साळुंके आदी उपस्थित होते.

आणखी कर्मचाऱ्यांचे निलंबन

मंगळवारी निलंबनाची कारवाई केल्‍यानंतर बुधवारी आणखी आंदोलनकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाई केलेले कर्मचारी नांदगाव, मालेगाव, पेठ आगारातील असल्‍याची माहिती मिळत आहे. दरम्‍यान, संबंधित आगारांच्‍या सूचना फलकावर नोटीस चिटकवत यासंदर्भात माहिती कळविली आहे.

सुमारे दोन हजार फेऱ्या रद्द

आंदोलनाची धग कायम असल्‍याने बुधवारी जिल्‍ह्यात सुमारे दोन हजार बसफेऱ्या रद्द कराव्‍या लागल्‍या. यामुळे दिवाळीत महामंडळाच्‍या तिजोरीत येणाऱ्या संभाव्‍य उत्‍पन्नावर पाणी फेरले जात आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com