Dhangar Reservation News : धनगर आरक्षणाचा ठोस निर्णय घ्या ; अन्यथा राज्यभर चक्काजाम

Reservation News : आमच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात अन्यथा गाठ धनगराशी आहे.
Dhangar Reservation News
Dhangar Reservation News Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी इथे 19 दिवसांपासून आण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर आमरण उपोषण करत आहेत. धनगर अरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदींच्या उपस्थितीत झालेली बैठक निष्फल ठरल्याने चौंडी मधील उपोषण आजही सुरूच आहे. सरकारचे मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना यशवंत सेनेत आहे. त्यामुळे उपोषण स्थळी आलेल्या सुरेश बंडगर यांची मुलगी प्रतीक्षा हिला वडिलांची उपोषणामुळे खालावलेली तब्येत पाहून रडू कोसळले.

या वेळी प्रतीक्षा बंडगर हिने माध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली. माझे वडील आणि आण्णासाहेब रुपनवर हे गेल्या 19 दिवसांपासून उपोषण आंदोलन करत आहेत. त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण नसून त्यांनी आता उपचारही सोडून दिले आहेत. याही परिस्थितीत आम्ही सर्वजण धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम असल्याचे प्रतीक्षा हिने सांगितले. आमच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात अन्यथा गाठ धनगराशी आहे, असा सज्जड इशारा तिने यावेळी दिला.

Dhangar Reservation News
Shivsena Disqualification News : सत्तासंघर्षावर बावनकुळेंना विश्वास! म्हणाले, 'बी प्लॅन'ची काही गरज नाही

जर सरकार वेळकाढूपणा करत असेल तर राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ असे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले यांनी यावेळी सांगितले. प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर हिने सरकारने धनगर आरक्षणाचे प्रमाणपत्र देऊन लवकरात समाजाचा प्रश्न सोडवावा असे आवहान केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंतसेनेच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 19 दिवसापासून उपोषण सुरू आहे. मुंबई (Mumbai) येथे सरकारने आरक्षणासंदर्भात बोलविलेल्या बैठकीची चर्चा निष्फळ ठरल्याने राज्यभरातील नेते व समाजबांधव चोंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त करत तीव्र आंदोलनासाठी तयार असल्याचे सांगत आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Dhangar Reservation News
Praful Patel News : शरद पवारांसोबतच्या फोटोवर अखेर पटेलांचा खुलासा : म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com