अजब निर्णय...लाच घेतली शिपायाने, शिक्षा झाली पोलिस निरीक्षकाला!

कनिष्ठांच्या गुन्ह्याची शिक्षा वरिष्ठांना; वरिष्ठ निरीक्षक चौधरी यांच्या बदलीने चर्चा
Ambad Police station
Ambad Police stationSarkarnama
Published on
Updated on

सिडको : पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाल्याने एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाल्याची काहीशी भावना सध्या तरी अंबड येथे घडलेल्या एका घटनेतून जनमानसामध्ये उमटताना दिसत आहे. सध्या याबाबत अशीच काहीशी चर्चा नागरिकांत चर्चिली जात आहे.

Ambad Police station
नाशिकच्या प्रशासनाने धसका घेतलेला तो `आर्यनमन` आहे तरी कोण?

कर्तव्यनिष्ठ, मितभाषी व घडलेल्या गुन्ह्याचा तपास अवघ्या काही कालावधीत करणारे अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी (P. I. Kumar Choudhary) यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच त्यांची विशेष शाखेत तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु श्री. चौधरी यांच्या बदलीस कारणीभूत ठरले आहे, ते म्हणजे नुकतेच अंबड पोलिस ठाण्यात लाचलुचपत विभागाने पकडलेले दोन पोलिस कर्मचारी. त्यात एक पोलिस उपनिरीक्षक, तर एका पोलिस हवालदाराचा समावेश आहे.

Ambad Police station
अजित पवार यांच्यासमोर तरी आपली एकजूट दिसली पाहिजे

त्याच्या आदल्या दिवशी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन युवकांचा निर्घृण खून झाला होता, तर दुसऱ्या दिवशी सातपूर पोलिस ठाणे हद्दीत भाजप मंडल अध्यक्षाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती; परंतु या दोन प्रकरणांत सर्वांत संवेदनशील घटना सातपूर व पंचवटी येथे घडल्या होत्या. या दुर्दैवी घटनेच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी व जनता रस्त्यावर आली होती. त्यामुळे सातपूर किंवा पंचवटी पोलिस अधिकाऱ्याची बदली होणे हे जनतेला अपेक्षित असताना अंबड पोलिसांची झालेली बदली ही अनपेक्षित होती.

याबाबत सध्या सिडको परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. यातून एकच सारांश बाहेर पडताना दिसत आहे आणि तो म्हणजे करतं कोण आणि भरतं कोण? कनिष्ठांच्या गुन्ह्याची शिक्षा वरिष्ठांना का, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, अशा प्रकारचा प्रतिसवाल यानिमित्ताने सिडकोवासीय उपस्थित करताना दिसत आहेत.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com