Godavari Aarti news: भारतीय जनता पक्षातील दोन गटातील राजकारण किती टोकाला जाऊ शकते याचे उदाहरण नाशिकमध्ये घडले आहे. श्रेयवाद आणि आर्थिक हितसंबंध यामुळे चक्क शहराचा एक चांगला प्रकल्प रखडला आहे. याबाबत भाजपचे नेते एकमेकांवर आरोप करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करीत असल्याने वाराणसीची राजकीय नेत्यांमध्ये विशेष चर्चा होते. वाराणसीला गंगा आरती हा एक महत्त्वाचा उपक्रम होतो. अनेक पर्यटक आणि धार्मिक कार्यकर्ते त्याला आवर्जून उपस्थिती दर्शवित असतात.
गंगा आरतीच्या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन शहरातील काही कार्यकर्त्यांनी रामकुंडावर गोदावरीची आरती करण्याचा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी जोरदार पाठपुरावा करण्यात आला त्याला शासनाकडून प्रतिसाद देखील मिळाला. त्याचे अनेकांनी कौतूक केले.
राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिकच्या दौऱ्यात या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी तातडीने ११ कोटी रुपयांचा निधी त्यासाठी वर्ग केला. यातून गोदावरी नदीच्या रामकुंड परिसराची सुशोभीकण रोषणाई. डिजिटल वॉल आणि अन्य उपक्रमांची उभारणी केली जाणार होती.
मात्र आर्थिक करायची कोणी, यावरून दोन गटात श्रेय वादाची आणि एकमेकांवर टीका करण्याची जोरदार स्पर्धा सुरू झाली होती. त्याचा फटका या आरतीला बसला आहे. येथे सुरू केलेले काम देखील बंद पाडण्यात आले. त्यामुळे एक चांगला उपक्रम सुरू होऊ शकला नाही.
याबाबत पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोदेची आरती पुरोहितच करणार, असा आग्रह धरला. प्रत्यक्षात मात्र एक स्वयंसेवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गट ही आरती करणार होता. हे दोन्ही गट भारतीय जनता पक्षाशीच संबंधित असल्याचे बोलले जाते.
त्यांच्यातील अंतर्गत मतभेद टोकाला गेले आहेत. त्यामुळे शहरातील एक चांगला प्रकल्प निधी उपलब्ध झाल्यावर आणि निविदासह सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही सुरू होऊ शकलेला नाही. आता तर थेट दोन्ही गट एकमेकांवर आरोप करीत आहेत.
या संदर्भात भाजप नेते प्रफुल्ल संचेती यांनी हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी खुप प्रयत्न केले. त्यासाठी गोदा घाटावरील पूर्वेकडच्या भागाची निवड करण्यात आली. मात्र हा घाट अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला आहे. त्यामुळे तेथे असा उपक्रम होऊ शकत नाही, असा आक्षेप दुसऱ्या गटाने घेतला.
याबाबत श्री. संचेती यांनी होळकर यांच्या वारसांकडून त्यासाठी परवानगी देखील आणली होती. मात्र एकमत होत असल्याने भाजपच्या या नेत्यांमधील विवाद संपला नाही. हा वाद संपवून नाशिक शहरातील पर्यटकांसाठी गोदा आरतीचा उपक्रम सुरू व्हावा यासाठी भाजपचे कोणते नेते पुढाकार घेतात, याची आता नागरिकांना उत्सुकता आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.