Sujay Vikhe News : पदवीधरमध्ये एका रात्रीत चित्र बदलण्याची भाजपची क्षमता; विखेंचा इशारा कुणाला ?

Ahmednagar Politics News : '' अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर सोडलं तर कुठेही काँग्रेस जिवंत नव्हती...''
Satyajeet Tambe, Sujay Vikhe Patil
Satyajeet Tambe, Sujay Vikhe Patil Sarkarnama

Nashik Graduate Constituency: नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. यात दोन्ही उमेदवारांनी विजयासाठी कंबर कसली असून मतांची जुळवाजुळवीसाठी त्यांची प्रचंड धावपळ सुरु असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. मात्र, याचदरम्यान अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी मोठा दावा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Nashik Election)

नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसनं तिकीट देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारीतून ऐनवेळी माघार घेतली.यानंतर सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याठिकाणी भाजपनं आपला उमेदवार देखील दिला नाही. यामुळे तांबे यांना भाजपचा पाठिंबा आहे का अशी चर्चा देखील झडू लागली. पण तसेच या प्रकारचे वक्तव्य देखील भाजप नेत्यांकडून करण्यात आली होती.

यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे हे आमचे उमेदवार नाही असं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे तांबे यांनी भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली नसून पाठिंबा मागितलेला नाही. पण आता याचवेळी अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी रात्रीतून चित्र बदलण्याची क्षमता भाजप कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं वक्तव्य भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलं आहे.

Satyajeet Tambe, Sujay Vikhe Patil
Nagar Congress Committee : नाना पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना दे धक्का : नगरची अख्खी जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त

भाजप(Bjp) खासदार सुजय विखे म्हणाले, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे योग्यवेळी पक्षाचा निर्णय देतील. निवडणूक जवळ आली असली तरी एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. ज्या माणसाचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि रात्रीतून चित्र बदलून टाकू अशी क्षमता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे याची अनुभूती सगळ्या जिल्ह्याला येईल असेही विखे यावेळी म्हणाले.

तसेच अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर सोडलं तर कुठेही काँग्रेस जिवंत नव्हती. काँग्रेसमध्ये कुणी नव्हतंच, त्यामुळे कुणी राजीनामा दिल्यानं काँग्रेस मोकळी होत नाही असा चिमटाही विखेंनी काढला. यावेळी नाशिक पदवीधरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अवस्थता असून जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे असल्याचंही विखेंनी यावेळी सांगितले.

Satyajeet Tambe, Sujay Vikhe Patil
Congress News : सत्यजित तांबेंना पाठिंबा देणे पडले महागात : काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद गमावावे लागले

सत्यजीत तांबे यांच्यावर अन्याय झाला...

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यावरून आता काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्यजीत तांबे यांच्यावर अन्याय झाला आहे असे म्हणत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com